भोंगे उतरवण्यात हातभर फाटली आणि म्हणतात बाबरी आम्ही पाडली, फडणवीसांनी बाबरी पाडणाऱ्यांचा इतिहासच सांगितला

भोंगे उतरवण्यात हातभर फाटली आणि म्हणतात बाबरी आम्ही पाडली, फडणवीसांनी बाबरी पाडणाऱ्यांचा इतिहासच सांगितला

भोंगे उतरवण्यात हातभर फाटली आणि म्हणतात बाबरी आम्ही पाडली, फडणवीसांनी बाबरी पाडणाऱ्यांचा इतिहासच सांगितला

राज्यात मशिदींवरील भोंग्यांवरुन टीका आणि आरोप -प्रत्यारोप सुरु आहेत. मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी ज्यांची हातभर फाटते आणि म्हणतात आम्ही बाबरी पाडली अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर घणाघात केला आहे. बाबरी पाडणाऱ्याऱ्यांची नावेच फडणवीस यांनी यावेळी सांगितले आहेत. बाबरी आम्ही पाडली असे म्हणणाऱ्या शिवसेनेला फडणवीसांनी चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी बूस्टर डोस सभेतून सत्ताधारी आणि शिवसेनेला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री म्हणाले तेव्हा बिळात होते. कोणीतरी फार चांगला प्रश्न विचारला आहे. म्हणाले मशिदींवरचे भोंगे काढण्यास सांगितले तर हातभर फाटली आणि म्हणतात आम्ही बाबरी मशिद पाडली. बाबरी ढाचा होता, कोणी हिंदू मशिद पाडू शकला नाही. पारतंत्र्याचा ढाचा होता. मग सांगा ढाचा पडला तर तुम्ही कुठे होता? तर मी अभिमानाने सांगतो तो ढाचा पाडण्यावेळी देवेंद्र फडणवीस तिथे होता. १८ दिवस बदायुच्या सेंट्रल जेलमध्ये फडणवीसने घालवले तेव्हा लाठी गोळी खाण्याचे काम केले आणि तुम्ही मला विचारत आहेत, अशा शब्दामध्ये फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे.

बाबरी पाडण्यासाठी महाराष्ट्राच कोणता नेता गेला

बाबरी पाडली तेव्हा महाराष्ट्रातील कोणता नेता गेला होाता. शिवसेनेचे एकाही नेते तिथे हजरप नव्हता. बाबरी पडली तेव्हा तो ढाचा पडला तेव्हा ३२ आरोपी होते. अडवाणी, डॉ. मुरलीमनोहर जोशी, स्व. कल्याणसिंग, उमा भारती, विनय कटियार, साध्वी ऋतंभरा, महंत नृत्य गोपालदास, रामविलास वेदांती, आचार्य धर्मेंद्र जी यांची नावे होती, जयभान सिंग पवय्या हे सुद्धा होते जे आता उपस्थित आहेत. या ३२ आरोपीमध्ये महाराष्ट्रातील कोणताच नेता पाहायला मिळत नाही. तीस वर्ष खटले लढणारे नेते होते. आमचा दोष काय तर एवढाच आहे की, आम्हाला प्रसिद्ध करता येत नाही आणि अणुशासन करता येत नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

कान खोलून एकून घ्या ढाचा पडला तेव्हा…

कान खोलून ऐकून घ्या ज्यावेळी संपूर्ण ढाचा पडला तेव्हा सगळ्यांनी निर्णय घेतला कोणी म्हणजे भाजपने पाडले कोणी पाडले ह्याने पाडले एक बैठक झाली तेव्हा ठरलं की, कोणीही श्रेय घ्यायचे नाही. राम सेवकाने हे काम केले आहे. कारसेवकाने केलं आहे. म्हणून कोणी विचारले तर ढाचा पाडणारा कारसेवक होता, कल्याण सिंह यांना विचारले की, गोळी चालवण्याची परवानगी का दिली नाही? ते त्यावर म्हणाले की, ढाचा पाडण्यात आला. तेव्हा ते म्हणाले तिथे लाखो कारसेवक होते कशी गोळी चालवणार, परंतु असे पुन्हा झाले तर मी पाठींबा देणार असे त्यांनी सांगितले. परंतु तुम्ही रामाला विरोध केला, राम खरच पैदा झाले का असा प्रश्न विचारणाऱ्यांच्या मांढीला मांढी लावून बसले आणि आम्हाला प्रश्न विचारत आहेत. काय आश्चर्य आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.


हेही वाचा : तुम्ही म्हणजे महाराष्ट्र, हिंदू आणि हिंदुत्व नाही, देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका

First Published on: May 1, 2022 8:33 PM
Exit mobile version