ST workers strike : मेस्मा लावण्याऐवजी कर्मचाऱ्यांशी चर्चा करा – देवेंद्र फडणवीस

ST workers strike : मेस्मा लावण्याऐवजी कर्मचाऱ्यांशी चर्चा करा – देवेंद्र फडणवीस

धनशक्ती सत्तेचा गैरवापर केला तरी भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष राहणार, फडणवीसांचा मविआवर हल्लाबोल

विरोधी पक्ष म्हणून भरपूर सहकार्य आम्ही पक्षाला केलं. तरीदेखील सरकारने जे दोन पाऊलं पुढे यायला पाहिजे. परंतु सरकार दोन पाऊल पुढे यायला मागत नाहीये. काल मला माहिती मिळाली की, एक उपोषणकर्ता कर्मचारी होते. परंतु त्यांचा देखील दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे. मला असं वाटतं की, सरकारच्या संवेदना हरवलेल्या आहेत. सरकारने मेस्मा कायदा लागू करण्यापेक्षा दुसरा मार्ग काढला पाहीजे. असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांसी संवाद साधला. तेव्हा त्यांनी एसटी कर्मचारी आणि शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर देखील टीकास्त्र सोडलं आहे. देवेंद्र फडणवीसांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं मुंबईत स्वागत झालं. यावर प्रसार माध्यमांकडून प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा फडणवीस म्हणाले की, सामना आणि संपादक यांचे केंद्रबिंदू आता बदलले आहेत. त्यांचे नेते अलीकडच्या काळात सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी झाले आहेत. असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

नायर रूग्णालयात दुर्लक्ष

नागर रूग्णालयात आग लावल्यामुळे मुलगा व वडिलांचा मृत्यू झाला होता. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अशा घटना सातत्याने घडत आहेत. परंतु साधं बघायला देखील तिकडे कोण जात नाही. दुर्दैवाने त्यांना बघायला देखील कोणी गेलं नव्हतं. त्यावेळी हा मुद्दा आमचे नगरसेवक आणि आमदारांनी मांडला होता. त्यानंतर हे प्रकरण पुढे आलं. सत्तेच्या मदमस्तमध्ये असलेले राज्यकर्ते याआधी मी कधीही पाहिलेले नाहीयेत. त्यामुळे जनता यांना कधीच माफ करणार नाही. अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचं संप सुरू आहे. राज्य सरकारने त्यांच्या वेतनात वाढ केली असून देखील एसटी कर्मचारी संप मागे घेण्याचं नाव घेत नाहीयेत. त्यामुळे राज्य सरकारने आता कठोर कारवाईस सुरूवात केली असून एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा कायदा लावण्याचा निर्णय राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मेस्मा लावण्याऐवजी कर्मचाऱ्यांशी चर्चा करा, असा सल्ला राज्य सरकारला दिला आहे.

First Published on: December 4, 2021 12:47 PM
Exit mobile version