कोणीही कितीही स्ट्रॅटेजी करा २०२४ मध्ये मोदीच येणार, पवार-किशोर भेटीवर फडणवीसांची प्रतिक्रिया

कोणीही कितीही स्ट्रॅटेजी करा २०२४ मध्ये मोदीच येणार, पवार-किशोर भेटीवर फडणवीसांची प्रतिक्रिया

कोणीही कितीही स्ट्रॅटेजी करा २०२४ मध्ये मोदीच येणार, पवार-किशोर भेटीवर फडणवीसांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि पश्चिम बंगालचे निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्या भेटीवर वावड्या उठवल्या जात आहेत. या भेटीचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. कोणीही कितीही स्ट्रॅटेजी करा आजही मोदीजीच आणि २०२४ मध्येही मोदीच येणार असे ठाम मत फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. तसेच पावसामुळे मुंबई तुबंण्यास केंद्र सरकार जबाबदार असल्याच्या वक्तव्याचाही फडणवीसांनी समाचार घेतला आहे. राज्य सरकारमधील नेते सकाळी उठून केंद्र सरकार जबाबदार हेच काम करत असतात असा टोलाच देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. फडणवीसांना पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तरात फडणवीस म्हणाले कोणी कोणाची भेट घ्यावी यावर कुठलेही बंधन नाही. विरोधी पक्षातील लोकं किंवा सत्ताधारी पक्षातील लोकं आपापल्या परिने स्ट्रॅटेजी तयार करत असतात. परंतु कोणीही कितीही स्ट्रॅटेजी तयार केल्या तरी आजही मोदीजी आहेत आणि २०२४लाही मोदीजीच राहणार आहेत. २०२४च्या निवडणूकीतही मोदींनाच आणि त्यांच्याच नेतृत्वात सरकार येईल त्यामुळे कोणीही स्ट्रॅटेजी करायला हरकत नाही असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

मुंबई तुंबण्यास केंद्र सरकार जबाबदार आहे असं शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटलं आहे. हिंदमाता, माटुंगा, सायन आणि दादर येथे पाणी साचतं यामुळे येथील अंडरग्राऊंड ड्रेनेज टनलसाठी परवानगी मागण्यात आली होती. परंतु ही परवानगी उशीराने दिली आहे. यामुळे याला भाजप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी जबाबदार असल्याचे खासदार शेवाळे यांनी म्हटले आहे. यावर सकाळी उठल्यानंतर पहिलं वाक्य केंद्र सरकार जबाबदार एवढंच काम यांचं आहे. असा टोला फडणवीसांनी लगावला आहे.

मराठा आरक्षणाबाबत नक्षली पत्र प्राप्त आलंय याबाबत फडणवीस यांनी राज्य सरकारने या पत्राची गांभीर्यानं दखल घेतली पाहिजे असे म्हटले आहे. जो नक्षल विचार आहे तो सरकारविरुद्ध असंतोष पसरवण्याचा प्रयत्न आहे. यामुळे या पत्राबाबत राज्य सरकारने गंभीर दखल घेतली पाहिजे असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

First Published on: June 12, 2021 5:08 PM
Exit mobile version