पंकजा मुडेंचा राज्याच्या राजकारणातून पत्ता कट

पंकजा मुडेंचा राज्याच्या राजकारणातून पत्ता कट

भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी करताना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि माजी मंत्री विनोद तावडे यांची कार्यकारिणीत केवळ विशेष निमंत्रित म्हणून बोळवण करण्यात आली आहे. तर भाजपातील ओबीसी समाजाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा पत्ता राज्य कार्यकारिणीतून कट करण्यात मुंडेविरोधी गटाला यश आले.

असून त्यांना केंद्रात मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याची सारवासारव करण्यात आली. पक्षाच्या पातळीवर केंद्रात त्यांना मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सांगितले. दर तीन वर्षांनी स्थानिक पातळी ते राष्ट्रीय पातळीवर संघटनात्मक बदल होतात त्यानुसार आज नव्या नियुक्त्या जाहीर होत असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीनंतर भाजपातील अनेक नेते नाराज होते. त्यामुळे नवी कार्यकारिणी कशी असेल याविषयी सर्वांनाच उत्सुकता होती.

विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारण्यात आलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, माजी मंत्री विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह विधानसभा निवडणुकीत पराभव झालेल्या आणि नाराज असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर कोणती जबाबदारी सोपविली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यापैकी फक्त नागपूरकर असलेले माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर महामंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार देवयानी फरांदे, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, श्रीकांत भारतीय, सुजित सिंह ठाकूर यांच्यावर महामंत्री म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. विजय पुराणिक यांची महामंत्री संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

शिंदे, रावल प्रदेश उपाध्यक्ष
माजी मंत्री राम शिंदे, जयकुमार रावल, संजय कुटे, माधव भंडारी, माजी आमदार सुरेश हळवणकर, खासदार प्रीतम मुंडे, आमदार प्रसाद लाड, चित्रा वाघ, माधवी नाईक, खासदार कपिल पाटील, खासदार भारती पवार, जयप्रकाश ठाकूर अशा 12 जणांवर उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

सरचिटणीसपदी देवयानी फरांदे,उपाध्यक्षपदी डॉ. भारती पवार 
नाशिक=भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी (दि.3) 12 उपाध्यक्ष, 12 सेक्रेटरी, पाच सरचिटणीसांची नवीन राज्य कार्यकारिणी जाहीर केली. यात नाशिक मध्य विधानसभेच्या आमदार देवयानी फरांदे यांची सरचिटणीसपदी नियुक्ती झाली, तर दिंडोरी लोकसभेच्या खासदार डॉ.भारती पवार यांची उपाध्यक्षपदी निवड झाली.

First Published on: July 4, 2020 6:56 AM
Exit mobile version