धनंजय मुंडे प्रकरणाची चौकशी एसपी दर्जाच्या महिला अधिकाऱ्यानं करावी – शरद पवार

धनंजय मुंडे प्रकरणाची चौकशी एसपी दर्जाच्या महिला अधिकाऱ्यानं करावी – शरद पवार

सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केल्याने एकच खळबळ उडाली आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनंजय मुंडे प्रकरणाची चौकशी एसपी दर्जाच्या महिसा अधिकाऱ्यानं करावी, अशी मागणी केली आहे. राष्टरवादी पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत संपूर्ण पोलीस चौकशीनंतरच योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं ठरलं, अशी माहिती शरद पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. शरद पवारांनी दिलेल्या माहितीवरुन राष्ट्रवादी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार नाही, असं स्पष्ट झालं आहे.

धनंजय मुंडेंवर झालेल्या लैंगिक आरोपांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची बैठक पार पडली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली. धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मात्र, आरोप करणाऱ्या व्यक्तीबद्दल काही गोष्टी पुढे आल्या आहेत. दरम्यान, आता हे प्रकरण पोलिसांत गेलं आहे. त्यामुळे पोलीस चौकशीनंतरच योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं पक्षाच्या बैठकीत ठरलं आहे, अशी माहिती शरद पवार यांनी दिली. तसंच एसपी दर्जाच्या महिला अधिकाऱ्याने या प्रकरणाचा चौकशी करावी, अशी मागणी शरद पवार यांनी केली.

 

First Published on: January 15, 2021 2:49 PM
Exit mobile version