पदासाठी चळवळ करणं कोणाच्या मनात येऊ नये, संभाजीराजेंच्या वक्तव्यावर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया

पदासाठी चळवळ करणं कोणाच्या मनात येऊ नये, संभाजीराजेंच्या वक्तव्यावर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया

संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या कार्यक्रमात शिरकाव करुन संभाजीराजेंना मराठा आरक्षणाविषयी प्रश्न विचारला होता यावेळी संभाजी राजे यांनी मला मुख्यमंत्री करा आणि मग प्रश्न विचारा असा इशारा कार्यकर्त्यांना दिला. याचे पडसात राज्यात उमटले आहे. या वक्तव्यवार राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चळवळ चांगली असेल तर चळवळीतील प्रश्न सुटत असतात, पदासाठी चळवळ करणं कोणाच्या मनात येऊ नये असे धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. सभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री पदाची इच्छा व्यक्त केली असल्याचे काही राजकारण्यांचे मत आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी परळीत माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांना संभाजीराजे यांनी मला मुख्यमंत्री करा या वक्तव्यावर प्रश्न विचारला असता. धनंजय मुंडे यांनी उत्तर दिलय की, सत्ता दिली म्हणजे प्रश्न सुटत नाही. चळवळ चांगली असेल तर प्रश्न सुटत जातात यश येतं त्यामुळे मनात प्रामाणिकपणा असावा, पदासाठी चळवळ करणं अस कोणाच्या मनात येऊ नये अशी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

विधानसभा अध्यक्ष काँग्रेसचाच

राज्याचे विधीमंडळाचे अधिवेशन येत्या ५ आणि ६ जुलैला घेण्यात येणार आहे. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षाची निवड करण्यात येणार आहे. हे अध्यक्षपद काँग्रेसकडेच असणार असल्याची माहिती मुंडे यांनी दिली आहे. तसेच मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. आरक्षणासाठी न्यायालयात लढणार असल्याचेही राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

मला मुख्यमंत्री करा मग प्रश्न विचारा

बीड दौऱ्याच्या दरम्यान खासदार संभाजीराजे छत्रपती चांगलेच संतापले होते. मला प्रश्न विचारायचे असतील तर आधी मला मुख्यमंत्री बनवा मगच मला प्रश्न विचारा असं वक्तव्य खसादर संभाजीराजे भोसले यांनी म्हटलं आहे. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी राजेंना प्रश्न विचारला असता संभाजीराजें चांगलेच भडकले होते. बीडमध्ये संभाजीराजे भोसले यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रम सुरु असताना संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शिरकाव केला आणि संभाजीराजेंना प्रश्न विचारला असता संभाजीराजेंनी कार्यकर्त्यांना चांगलेच झापले आहे. संभाजीराजेंनी उत्तर देताना मुख्यमंत्री होण्याची इच्छा मात्र व्यक्त केली आहे.

First Published on: July 3, 2021 8:13 PM
Exit mobile version