Live Result : धुळे महापालिकेत भाजपचेच ‘अच्छे दिन’

Live Result : धुळे महापालिकेत भाजपचेच ‘अच्छे दिन’

धुळे महानगरपालिका

धुळे महापालिकेमध्ये भाजपनं सत्ता काबीज केली आहे. धुळ्यात भाजपनं ५० जागा जिंकल्या असून भाजपच्या हाती धुळेकरांनी सत्ता दिल्याचं आता स्पष्ट झालं आहे. दरम्यान, बंडखोरी केलेल्या अनिल गोटे यांच्या लोकसंग्राम पक्षाला मात्र धुळेकरांना साफ नाकारल्याचं दिसत आहे. कारण अनिल गोटे यांच्या लोकसंग्राम पक्षाला केवळ ३ जागा मिळाल्या आहेत. या विजयानंतर गिरीश महाजन यांनी अनिल गोटेंवर चौफेर हल्ला चढवला आहे. धुळेकरांनी अनिल गोटेंना त्यांची जागा दाखवून दिली आहे. आता गोटेंनी घरी बसावं, शांत राहावं असा सल्ला गिरीश महाजन यांनी अनिल गोटेंना दिला आहे. यावेळी त्यांनी पक्षाबद्दल अपशब्द वापरून मोठी चूक केली असं देखील गिरिश महाजन यांनी म्हटलं आहे. दरम्यान माझी नियुक्ती झाल्यानं गोटे नाराज झाले आणि त्यांनी बंड केलं असं देखील महाजन यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी अनेक सवाल उपस्थित करत अनिल गोटेंना लक्ष्य केलं. दरम्यान आम्ही शिवसेनेला सोबत घेऊ असे संकेत देखील त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. तसेच आता धुळेकरांना दिलेली वचनं पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं देखील गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं आहे.

संध्या. ६ – धुळ्यात भाजपचाच बोलबाला, ५० जागांवर आघाडी, राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीला १४ जागा


दरम्यान धुळ्यामध्ये काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीला १८ जागा, शिवसेनेला ७ जागा, एमआयएमला ४ जागा आणि लोकसंग्राम पक्षाला ३ जागा मिळाल्या आहेत.


धुळ्यात मनपानं ३८ जागांवर आघाडी घेतली आहे.  तर, काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीनं १८ जागी आघाडी घेतली आहे. शिवसेना मात्र ७ जागांवर आघाडीवर आहे. विषेश बाब म्हणजे बंडखोरी केलेले भाजप आमदार अनिल गोटे यांच्या लोकसंग्राम पक्षानं ३ जागांवर आघाडी घेतली आहे. एकंदरीत निकाल पाहता भाजप बहुमताच्या दिशेनं वाटचाल करताना दिसत आहे. तर एमआयएमचे ३ नगरसेवक निवडून आले आहेत.


धुळे मनपामध्ये भाजपनं ३७ जागांवर आघाडी  घेतली आहे. तर, शिवसेना ७ जागांवर आघाडीवर आहे. यामध्ये आघाडीच्या जागा मात्र आश्चर्यकारकरित्या घसल्याचं पाहायाला मिळालं. कारण काही वेळापूर्वी २७ जागांवर आघाडीवर असलेली काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडी आता मात्र १४ जागांवर घसरली आहे.


धुळे मनपामध्ये भाजपनं ३१ जागी आघाडी घेतली आहे. निवडणुकीमध्ये भाजपनं जोरदार मुसंडी मारल्याचं चित्र पाहायाला मिळत आहे. तर आघाडी दुसऱ्या स्थानावर आहे.


धुळे मनपामध्ये भाजपनं २३ जागी, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीनं १५ तर लोकसंग्राम पक्षानं एका जागी आघाडी घेतली आहे.


धुळे मनपामध्ये भाजपनं १६ तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीनं १२ जागांवर आघाडी घेतली आहे.


भाजप आमदार अनिल गोटे यांनी भाजपसोबत केलेल्या बंडखोरीमुळे धुले महापालिका निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. थोड्याच वेळात धुळे महापालिकेचे निकाल जाहीर होणार आहेत. या निवडणुकीत भाजपसहीत गोटे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. धुळे महापालिकेच्या ७३ जागांसाठी ६० टक्के मतदान झालेले आहे. गोटे यांचा लोकसंग्राम पक्ष आणि भाजप या दोन पक्षात प्रमुख लढत असली तरी काँग्रेस-राष्ट्रवादी, शिवसेना आणि इतर पक्षही ताकदीने या निवडणुकीत उतरले आहेत.

धुळे महापालिका – ७३ जागा

भाजप – ५०

शिवसेना – ०२

काँग्रेस-राष्ट्रवादी – १४

लोकसंग्राम पक्ष – ०३

एमआयएमए – ०४

First Published on: December 10, 2018 10:17 AM
Exit mobile version