मृत प्रवाशाच्या कुटुंबाला ९ वर्षांनी दिली नुकसान भरपाई

मृत प्रवाशाच्या कुटुंबाला ९ वर्षांनी दिली नुकसान भरपाई

डोक्यात सीट पडून महिलेचा मृत्यू झालेल्या कुटुंबाला देण्यात आली नुकसान भरपाई

ट्रेनमध्ये प्रवास करताना डोक्यात सीट पडून एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना २००९ मध्ये घडली होती. या घटनेमुले तिच्या कुटुंबियानी ग्राहक मंचाकडे रेल्वेविरोधात साडेसहा लाखाचा दावा ठोकला होता. मात्र स्थानिक ग्राहक मंचाने १.९२ लाख नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते. परंतु कुटुंबियाने त्या रक्कमेला विरोध करुन साडेसहा लाखाची मागणी केली. अखेर नऊ वर्षांनी गुजरात ग्राहक मंचाला जाग आली असून सरकारने साडेचार लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे.

नेमके काय घडले?

२००९ मध्ये खेडब्रम्हा – तलोद ट्रेनमधून सविता तरल (३५) ही महिला प्रवास करत होती. या प्रवासा दरम्यान ट्रेनला ब्रेक देण्यात आला. अचानक ब्रेक लागल्यामुळे वरचा बर्थ आणि त्यावरील सामान सविता तरल यांच्या डोक्यावर आढळले आणि त्या जागच्या जागी ठार झाल्या. या घटनेमुळे सविता तरलच्या कुटुंबियानी ग्राहक मंचाकडे रेल्वेविरोधात साडेसहा लाखाचा दावा ठोकला. मात्र स्थानिक ग्राहक मंचाने साडेसहा लाखाला विरोध करत १.९२ लाख नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. मात्र इतक्या तुटपुंज्या नुकसान भरपाईविरोधात तरल कुटुंबियांनी राज्य ग्राहक मंचाचकडे दाद मागितली. अखेर राज्य ग्राहक मंचाने ही रक्कम वाढवून साडेचार लाख केली आहे. ही देण्यात आलेली रक्कम मुलांचं नुकसान, अंतिम संस्कारावरील खर्च आणि आर्थिक नुकसान अशा सगळ्या खर्चांचा विचार करुन सविता तरल यांच्या कुटुंबियांना साडेचार लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे.


संबंधित बातम्या – 

वाचा – जखमी प्रवाशांनाही नुकसान भरपाई द्या – सर्वोच्च न्यायालय

First Published on: November 13, 2018 11:32 AM
Exit mobile version