दिलीप वळसे पाटील महाराष्ट्राचे नवे गृहमंत्री

दिलीप वळसे पाटील महाराष्ट्राचे नवे गृहमंत्री

Sulli Deals App: ‘सुल्ली डील’ प्रकरणी कारवाईचे गृहमंत्र्यांचे आदेश

अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता दिलीप वळसे पाटील यांच्याकडे गृहमंत्री पदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकृत करावा असं म्हटलं आहे. तसंच गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात यावा असंही या पत्रात म्हटलं आहे. त्यामुळे आता दिलीप वळसे पाटील हे राज्याचे नवे गृहमंत्री असणार आहेत.

दिलीप वळसे पाटील यांच्याकडे गृहमंत्री पदाचा कार्यभार सोपवल्यानंतर सध्या त्यांच्याकडे असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफ व राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे द्यावा, अशी पत्रात विनंती करण्यात आली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस गृह खात्याची जबाबदारी दिलीप वळसे – पाटील यांच्याकडे सोपवणार असल्याची चर्चा होती.

First Published on: April 5, 2021 7:19 PM
Exit mobile version