दिलीप वळसे पाटील कोरोना पॉझिटिव्ह

दिलीप वळसे पाटील कोरोना पॉझिटिव्ह

कामगार आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. आज (गुरुवारी) सकाळी मंत्रालयात आले होते. मात्र, त्यांची कोरोना चाचणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे इतर मंत्र्यांची धाकधूक वाढली आहे.

मंत्रिमंडळ बैठक आज आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी दिलीप वळसे पाटील मंत्रालयात दाखल झाले. मात्र कॅबिनेट बैठकीपूर्वी त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचं त्यांना समजलं. त्यानंतर त्यांनी जराही वेळ न घालवता तातडीने घरी जाण्याचा निर्णय घेतला.

दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची कोणतीही लक्षणं नाहीत. ते थोड्या वेळातच रुग्णालयात दाखल होणार आहेत, अशी माहिती त्यांच्या निकवर्तीयांनी दिली आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज्यातील प्रमुख नेत्यांना कोरोनाची लागण होत आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना कोरोनाची लागण झाली आहे.

First Published on: October 29, 2020 3:55 PM
Exit mobile version