आमदारावर नाराज होऊन भाजप नेत्याचा शिंदे गटात प्रवेश, प्रकाश सुर्वेंच्या प्रयत्नांना यश

आमदारावर नाराज होऊन भाजप नेत्याचा शिंदे गटात प्रवेश, प्रकाश सुर्वेंच्या प्रयत्नांना यश

मुंबई – एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करून ४० आमदार फोडले. या ४० आमदारांना घेऊन भाजपसोबत सत्ता स्थापन केली. या अनाकलनीय सत्तांतराची जगभर चर्चा झाली. आता एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्याच एका नेत्याला गळाला लावले आहे. मुंबईतील भाजप आमदारावर नाराज झालेल्या एका नेत्याने थेट शिंदे गटात प्रवेश केल्याचं समोर येतंय.

एकनाथ शिंदे यांचा गट मुंबईसह इतर महापालिकांच्या निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. पक्षसंघटनापासून सुरुवात करण्यात आळी असून आमदार आणि नगरसेवकांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यातच, मुंबईतील भाजप आमदारावर नाराज होऊन एका नेत्याने आमदार प्रकाश सुर्वे यांच्या नेतृत्त्वाखाली शिंदे गटात प्रवेश केला आहे. आमदार प्रकाश सुर्वे यांनी आतापर्यंत अनेकांना शिंदे गटात आणलं आहे. आता त्यांनी चक्क भाजपच्याच नेत्यांना शिंदे गटात आणल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

भाजप नेते राम यादव आणि रेखा यादव यांनी रमेश सुर्वे यांच्या नेतृत्त्वाखाली शिंदे गटात प्रवेश केला आहे. भाजपाच्या आमदार मनीषा चौधरी या यादव यांची राजकीय कोंडी केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

उत्तर भारतीयांना आकर्षित करण्यासाठी भाजापाला राम यादव यांचा वापर करता आला असता. मात्र, भाजपाचा हा नेता आता शिंदे गटाने गळाला लावला असल्याने त्यांच्यामुळे उत्तर भारतीयांची मते आता शिंदे गटाकडे वळण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिंदे गटाला फायदा होऊ शकतो.

आमची सर्व नेत्यांवर नाराजी आहे. आम्ही महिला नेत्याच्या कार्यालयात जायचो तेव्हा त्यांनी आम्हाला बसून दिले जात नसे. आम्हाला त्यांची भेटही मिळत नव्हती, असं मनीषा चौधरी यांचं नाव न घेता रेखा यादव यांनी आरोप केला आहे.

First Published on: October 19, 2022 11:45 AM
Exit mobile version