नाशिकमधील दुर्घटनेचे विधानसभेत पडसाद

नाशिकमधील दुर्घटनेचे विधानसभेत पडसाद

Vidhan Bhavan : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विधान भवनात होणार दोन शिफ्टमध्ये काम, राज्य सरकारचा मोठा निर्णय

नाशिकमधील बिल्डर सुजॉय गुप्ता यांच्या अपना घर या निर्माणाधीन प्रकल्पात पाण्याची टाकी कोसळून तिघांचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेचे पडसाद मंगळवारी, २ जुलैला विधानसभेतही उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी या प्रकरणाकडे लक्ष वेधतानाच बिल्डरसह जबाबदार असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. ही असुरक्षितता म्हणजे सरकारचे अपयश असल्याचा आरोप करतानाच अनागोंदी कारभारावरुन त्यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावरही निशाणा साधला.

विधानसभेत बोलताना पवार पुढे म्हणाले की, मनुष्यजन्म एकदाच मिळत असतो. त्यामुळे किड्या-मुंग्यासारखे लोक मरत असतील तर हे सरकारचे अपयश आहे. त्यामुळे याची सर्वस्वी जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे. त्यामुळे अशा घटना घडू नयेत, यासाठी सरकारने कठोर उपाययोजना करावी. घटना कुणामुळे घडली. याचा तपास करून त्या बिल्डरवर गुन्हा दाखल करावा. बिल्डरचे मनपा अधिकाऱ्यांसमवेत लागे-बांधे असतात त्यामुळे ते कोणाचेही ऐकत नाही. मुंबईसाठी तुम्ही मदत करत आहातच पण नाशिक, पुणे, कल्याण या ठिकाणी देखील महापालिकांना पाच लाखंची मदत करायला सांगा. सोबतच जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा. अशा मागण्या अजित पवार यांनी केल्या.
यावर प्रत्युत्तर म्हणून मुख्यमंत्र्यांनी घटनेची पुर्ण चौकशी केली जाईल. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. कुणालाही सोडणार नाही.अशी प्रतिक्रिया दिली.

First Published on: July 2, 2019 2:22 PM
Exit mobile version