शहर व जिल्ह्यातील १४ पोलीस निरीक्षकांना पदोन्नतीचे ‘दिवाळी गिफ्ट’; बघा कोणाची झाली बढती

नाशिक : राज्यभरात विविध शासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, पोलीस कर्मचारी यांच्या बदलीचे सत्र सुरू आहे. कोरोनाच्या काळात अनेक पदांवरील अधिकार्‍यांच्या बदल्या थांबल्या होत्या. त्याचसोबत अनेक अधिकार्‍यांची पदोन्नतीही रखडली होती. नाशिक शहर पोलीस आयुक्तालय तसेच नाशिक ग्रामीण पोलीस अंतर्गत असलेल्या काही पोलीस निरीक्षकांच्या पदोन्नती होणे अपेक्षित होते. राज्यात नवे सरकार आल्यानंतर अनेक बदल्या तसेच पदोन्नतीचे मार्ग मोकळे झाले आहेत. नाशिक शहर आयुक्तालय तसेच नाशिक ग्रामीण पोलीस अंतर्गत असलेल्या एकूण १२ आणि महाराष्ट्र पोलीस अकादमी मध्ये कार्यरत असलेल्या २ पोलीस निरीक्षकांना पदोन्नतीचे दिवाळी गिफ्ट मिळाले आहे. या पोलीस निरीक्षकांना आता सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर नियुक्ती देण्यात आली आहे.

संबंधित अधिकार्‍यांच्या सेवेचा कार्यकाळ तसेच इतर बाबी लक्षात घेता त्यांची याआधीच पदोन्नती होणे अपेक्षित होते. परंतु, राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी तसेच इतर काही प्रशासनिक घडामोडी यामुळे ही पदोन्नती रखडली होती. राज्यभरात अनेक शासकीय अधिकार्‍यांच्या रखडलेल्या बदल्या, त्याचसोबत पदोन्नतीचा मार्ग मागील महिन्याभरात मोकळा झाला आहे. त्याच अनुषंगाने आता नाशिक शहरातील ८ तसेच ग्रामीण मधील २ यांच्यासह  महाराष्ट्र पोलीस अकादमी मध्ये कर्तव्य बजावत असलेले २, गुन्हे अन्वेषण विभागाच्या एक आणि इतर एक अश्या नाशिक शहर व जिल्ह्यात कर्तव्य बजावत असलेल्या एकूण १४  पोलीस निरीक्षकांची सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर पदोन्नती झाली आहे. राज्यभरातील १७५ पोलीस निरीक्षकांची सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर पदोन्नती करण्यात आली.

पदोन्नतीचे गिफ्ट कोणाला ?

First Published on: November 4, 2022 8:50 PM
Exit mobile version