राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हनुमंत डोळस अत्यवस्थ; मृत्यूची फक्त अफवा

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हनुमंत डोळस अत्यवस्थ; मृत्यूची फक्त अफवा

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हनुमंत डोळस

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस मतदारसंघाचे आमदार हनुमंत डोळस यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे वृत्त मिळत आहे. सध्या ते मुंबईतील सैफी रुग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र त्यांचे निधन झाले असल्याची बातमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल केली जात आहे. यावर त्यांचे सुपुत्र संकल्प डोळस यांनी खेद व्यक्त केला असून, अशा अफवा पसरवू नका, असे आवाहन केले आहे. डोळस यांचे वय ५६ वर्ष असून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. डोळस हे २००९ आणि २०१४ असे सलग दोनदा माळशिरस या मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून ते पक्षाचे सदस्य आहेत. मोहिते पाटील यांच्या जवळचे सहकारी म्हणून ते ओळखले जात होते, मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात विसंवाद निर्माण झाला असल्याची चर्चा आहे. २००९ साली माळशिरस हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आला होता. तेव्हापासून डोळस हे या मतदारसंघातून निवडून येत आहेत.

 

First Published on: April 29, 2019 9:41 PM
Exit mobile version