तिसरी आघाडी नको, महाआघाडी करूया

तिसरी आघाडी नको, महाआघाडी करूया

 2019 च्या निवडणुकांआधी राज्यातल्या राजकीय घडीमोडींना वेग वाढला असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि भारिप बहुजन संघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यात शनिवारी बैठक झाली. यावेळी राज्यात तिसरी आ घाडी करण्यापेक्षा महा आघाडी करून भाजपला पराभूत करूया, असा प्रस्ताव राजू शेट्टी यांनी प्रकाश आंबेडकर यांना दिला. यावर आपण विचार करु, असे आ श्वासन आंबेडकर यांनी दिले,

राजगृह येथे राजू शेट्टी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात बैठकी झाली. यावेळी आमदार कपिल पाटील आणि स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर हे सुद्धा या बैठकीला उपस्थित होते. भारिप आणि एमआयएमने बहुजन वंचित विकास आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीची पहिली जाहीर सभा 2 ऑक्टोबरला औरंगाबादेत पार पडली. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र या बहुजन विकास आघाडीचा भाजपला फायदा होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. हे लक्षात घेऊन शेट्टी यांनी आबेडकर यांची भेट घेऊन त्यांचे मन वळव ण्या चा प्रयत्न केला.

भाजपविरोधात या घडीला सर्वांनी एकत्र येण्याची ग रज आहे. देशात मोदी सरकारने हिटलर शाही आणली असून 1977 प्रमाणे आणीबाणीचे वातावरण आहे. मोदी यांची एकारशाही.मोडून काढायची असेल तर तिसर्‍या आघाडीपेक्षा महाआघाडी महत्वाची आहे. भाजप विरोधात विरोधकांनी मिळून एकाच उमेदवार दिला तरच सत्ताधार्यांना विरोधक पराभूत करू शकतात. अन्यथा विरोध कांच्या दुफळीचा फ यदा घेऊन पुन्हा भाजप सत्तेवर येण्याची भीती आहे, असे शेट्टी यांनी आंबेडकर यान समजावले.

स्वाभिमानीला जागा देण्यास राष्ट्रवादी तयार?

एकीकडे राजू शेट्टी-प्रकाश आंबेडकर यांची भेट होत असताना, तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसचीही बैठक झाली.. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसकडे 25 जागांचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यातील एक जागा स्वाभिमानीला सोडण्यास तयार असल्याचं राष्ट्रवादीने म्हटले आहे. त्यामुळे शेट्टी-आंबेडकरांच्या बैठकीनंतर काय ठरणार, राजू शेट्टी आंबेडकर-ओवेसींसोबत जाणार की पवारांची साथ देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादीने प्रस्ताव दिलेला नाही- तुप कर

राजू शेट्टी यांना हातकङ्ग्लेची जागा सोडण्यास राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी आहे, असे सांगितले ज्जत असले तरी तसा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही, यामुळे याविषयी आताच काही बोलणे उचित ठरणार नाही, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी सङ्ग्त्नेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपेकर यांनी व्यक्त केली.

First Published on: October 7, 2018 1:59 AM
Exit mobile version