‘डॉक्टर हनुमान’; दररोज मंदिरात होते हजारो रुग्णांची गर्दी

‘डॉक्टर हनुमान’; दररोज मंदिरात होते हजारो रुग्णांची गर्दी

देवाला सुध्दा मनुष्याच्या मदतीसाठी वेगवेगळी रूपं घ्यावी लागतात. जशी देव आपली परीक्षा घेत असतो तशी मदतही करत असतो. असेच एक ठिकाण आहे. जिथे साक्षात हनुमानजी डॉक्टर आहेत आणि भक्तांवर उपचार करतात.

“नासे रोग हरे सब पीरा
जप निरंतर हनुमत बीरा”

हनुमान चालीसाची ही पंक्ती इथे हुबेहूब लागू होते. दंदरुआ धामचे हनुमान आपल्या भक्तांची संकट, दुर्धर आजार नाहीशी करतात. जिथे विज्ञानाला कधी कधी आजारांपुढे हात टेकावे लागतात अशा वेळेस देवांच्या शरण जावे लागते. आणि डॉक्टर हनुमानाच्या शरणी जो जातो त्याभक्ताचे आजार दूर पळतात असे हे डॉक्टर हनुमान.
ह्या दांदरुआ धाम येथे खुद्द हनुमानजी डॉक्टर रुपात आहे. ह्या ठिकाणी येणार्‍या भक्तांचे आजार दूर करणारे हनुमान जी म्हणून प्रख्यात आहे. डॉक्टर हनुमान…

ग्वालियरपासून साधारण 60 किमी अंतरावर असलेल्या एका छोट्याशा मंदिरात डॉक्टर हनुमानजी आहेत. मध्य प्रदेशच्या ग्वालियर जिल्ह्यातील भिंड तालुक्यात मेहगावं ह्या गावात डॉक्टर हनुमानजी मंदिर आहे. साधारण 500 वर्ष जुने मंदिर असून हनुमाजींची अत्यंत आकर्षक मूर्ती आहे. समोरच प्रभू राम लक्ष्मण आणि सीता मातेचे मंदिर आहे. हे एक प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान असून भाविकांची अपार श्रध्दा असलेले स्थान आहे. खास म्हणजे नृत्य स्वरूपात असलेली ही अत्यंत प्रसन्न मूर्ती आहे. एक हात माथ्यावर आणि एक हात कमरेवर अशी अभय देणारी ‘गोपी वेश धारी’ अत्यंत प्रसन्न अशी एकमेव मूर्ती आहे. 500 वर्षांपूर्वी काम करत असताना गावाजवळ असलेल्या तलावाच्या काठावर निम झाडाच्या मुळाशी ही प्रतिमा सापडली. डॉक्टर हनुमानजींवर भक्तांची अपार श्रद्धा आहे. शारीरिक व मानसिक व्याधींपासून मुक्ती देणारे हे हनुमान आहेत. जिथे विज्ञानाला कधी कधी आजारांपुढे हात टेकवावे लागतात पण डॉक्टर हनुमान दर्शनाने त्यांची सेवा केल्याने सर्व रोगांपासून मुक्ती मिळते अशी भक्तांची अपार श्रद्धा आहे. भाविकांवर दुर्धर आजारांचे असलेले संकट सुध्दा हे संकट मोचक बजरंग बली, त्यांच्या दर्शनाने नाहीशी करत असल्यामुळे वर्षभर इथे लोकांची गर्दी असते. कोरोनाकाळात हनुमानजींची खास करून डॉक्टरांच्या वस्त्रांनी पूजा करण्यात आली होती. मंगळवार आणि शनिवार इथे मोठ्या प्रमाणत गर्दी असते.

काही भक्त 5, 7, 9 किंवा 11 मंगळवार किंवा शनिवारी दर्शनासाठी येतात, तर काही जण 5 किंवा 7 प्रदक्षिणा घालतात, श्रीफळ वाहतात आणि नवस फेडतात तर काहीजण अनुष्ठान, पूजा करतात. इथे येणारे भाविकांना, रुग्णांना विभूती, रक्षा दिली जाते. ज्यामुळे असाध्य रोगसुध्दा बरे होत असल्याने देशभरातून भक्तगण इथे दर्शनासाठी येत असतात. येणार्‍या भाविकांसाठी इथे सकाळ-सायंकाळ भंडार्‍याचे आयोजन करण्यात येते. वर्षातून हनुमान जन्म व नोव्हेंबरमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. यावेळेस लाखो भाविक दर्शनासाठी येथे येतात. दंदरुआ धाम म्हणजे येथे गो शाळा असून 300 गायींची सेवा केली जाते.

First Published on: November 4, 2022 3:48 PM
Exit mobile version