शेतकर्‍याला संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारकडे प्लॅन आहे का ?

शेतकर्‍याला संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारकडे प्लॅन आहे का ?

नाशिकरोड : परतीच्या पावसाच्या संकटातून शेतकर्‍यांना बाहेर काढण्यासाठी सरकारकडे काही प्लॅन आहे का, पिकविमा देणार्‍या कंपन्यांची मुजोरी अधिक वाढली आहे. त्या कंपन्यांना आवर घालणार आहात की नाही, असा सवाल उपस्थित करत छत्रपती संभाजीराजे यांनी राज्य सरकारला लक्ष केले.

नाशिक हनी बी फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीच्या गोडवा गूळ कारखान्याचा दुसरा गळीत हंगाम मंगळवारी (दि.१८) स्वराज्य पक्षाचे संस्थापक छत्रपती युवराज संभाजीराजे यांच्या हस्ते मोळी टाकून प्रारंभ केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर होते. यावेळी कारखाना परिसरात वृक्षारोपण केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी कारखान्याचे अध्यक्ष विष्णुपंत गायखे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी राजे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी छत्रपती संभाजीराजे यांनी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीवरुन सरकारला लक्ष केले.

संभाजीराजे भोसले म्हणाले की, परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. विमा कंपन्या शेतकर्‍यांना पैसे देतात का. या विमा कंपन्यांना तुम्ही आवरणार आहात की नाही. काही नियमावली तयार झाली आहे का. शेतकर्‍यांवर येणार्‍या संकटांना मदत होण्यासाठी सरकारचा नियोजनाचा काय प्लॅन आहे का. मला सरकारवर टिका करायची नाही. मात्र, केवळ मुंबई-दिल्लीत बसून या गोष्टी साध्य होऊ शकत नाही. छोट्या पिकांना संरक्षण नाही परंतू त्यांना दिलासा देण्याचे काम सरकारचे असल्याचे सांगत प्रश्न उपस्थित करत स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याचे आवाहन छत्रपती संभाजी राजे यांनी केले.

कंपनीचे अध्यक्ष विष्णुपंत गायखे यांच्या मातोश्री शेवंताबाई केरु गायखे यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा परिषद व संत आईसाहेब महाराज विद्यालयातील गरजू विद्यार्थींना सायकल भेट देण्यात आल्या. यावेळी अण्णासाहेब पाटील महामंडळ जिल्हा समन्वयक पल्लवी मोरे, संजय तुंगार, सरपंच प्रिया गायधनी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, निरीक्षक राजू पाचोरकर, विकास भागवत, गणेश कदम, उपाध्यक्ष निलेश दिंडे, सचिव माणिक कासार, शिवराम गायधनी, शरद टिळे, दिलीप गायधनी, कांचन बर्वे, नाना सरोदे, मुक्ता पाळदे, सविता तुंगार, उपसरपंच दिलीप गायधनी, माजी सरपंच सुरेखा गायधनी, उल्हास बोरसे, राजाराम गायधनी, माधव गायधनी, संतोष ढमाले आदी उपस्थित होते.

First Published on: October 19, 2022 1:20 PM
Exit mobile version