मुंबईतील वाहतूक कोंडीवर लवकरच डबलडेकर टनेलचा पर्याय; मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली महत्त्वाची बैठक

मुंबईतील वाहतूक कोंडीवर लवकरच डबलडेकर टनेलचा पर्याय; मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली महत्त्वाची बैठक

मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडीतून सामान्य मुंबईकरांची सुटका व्हावी यासाठी मुंबईसाठी एकात्मिक वाहतूक व्यवस्थापनाबाबत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. मुंबईसाठी डबलडेकर टनेलचा पर्याय अवलंबण्यासाठी वरिष्ठ सनदी अधिकारी आणि एकात्मिक वाहतूक प्रणाली यंत्रणा तयार करणाऱ्या तंत्रज्ञांनी बैठक घ्यावी त्याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

वर्षा निवासस्थानी यासंदर्भात झालेल्या या बैठकीत मुंबईतील वाढती वाहतुक आणि त्यावरील उपाय, सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. मल्टी मॉडेल इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्टेशन नेटवर्क टनेलच्या माध्यमातून साकारण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी सादरीकरण करण्यात आले.

एमएमआरडीए क्षेत्र एकात्मिक वाहतुक प्रणालीद्वारे जोडून वाहतूक कोंडी कमी करण्याबाबत चर्चा करण्यात आली. मुंबईसाठी मल्टीडेक टनेल काळाची गरज असून त्याचा अभ्यास करण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, एमएमआरडीएचे आयुक्त श्रीनिवासन, मुंबई महापालिकेच्या अतिरीक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी तांत्रिक टीम सोबत बैठक घेऊन या एकात्मिक वाहतूक प्रणालीबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.

यावेळी आमदार राजेंद्र पटणी, महापालिका आयुक्त आय. एस. चहल, एमएमआरडीएचे आयुक्त श्रीनिवासन, मुंबई महापालिकेच्या अतिरीक्त आयुक्त अश्विनी भिडे, पी. वेलारासू आदी यावेळी उपस्थित होते.


नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी काँग्रेसकडून डॉ. सुधीर तांबेंना उमेदवारी जाहीर

First Published on: January 12, 2023 3:12 PM
Exit mobile version