डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अनेक कडक निर्बंध; हे आहेत नवीन नियम

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अनेक कडक निर्बंध; हे आहेत नवीन नियम

औरंगाबाद : डाॅ. बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठ परिसराच्या सुरक्षेसंदर्भात नुकतीच सुरक्षा समितीची बैठक पार पडली. या बैठकीत विद्यापीठ कॅम्पसच्या सुरक्षेबाबत अत्यंत महत्वपूर्ण आणि कडक नियम तयार करण्यात आले. त्यात मुख्यत्वे १८ निर्णय घेण्यात आले आहेत. वाहनांची वेग मर्यादा ते अगदी आंदोलने, मोर्चे यांबाबत हे निर्णय आहेत.

समिती अध्यक्ष कुलसचिव भगवान साखळे, सचिव उपकुलसचिव विष्णू कऱ्हाळे, कार्यकारी अभियंता आर. डी. काळे, डॉ. मुस्तजीब खान, डाॅ. कैलास पाथ्रीकर, डाॅ. पुरषोत्तम देशमुख व सुरक्षा अधिकारी उपस्थित होते. प्रशासकीय इमारतीसमोर आंदोलनास पूर्वपरवानगी लागेल. उपोषण, मोर्चे आंदोलनाला पोलिसांची परवानगी बंधनकारक राहील. कुलगुरू कार्यालयात आंदोलकांना परवानगीशिवाय प्रवेश मिळणार नाही, असे ठरले. आंदोलनांच्या परवानगीसाठी कुलसचिवांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. परिसरातील फुले तोडण्यास मनाई करण्यात आली. मोकाट जनावरांचा बंदोबस्त. विद्यापीठ प्रवेशद्वारापासून ते विधी विभागापर्यंत मुख्य रस्त्यावर गरजेनुसार गतिरोधक, बारा ठिकाणी सीसीटीव्हीची व्यवस्था करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला तसेच विद्यापीठात वाहनांची वेगमर्यादा २० किमी प्रति तासावर नसेल, याकडे सुरक्षा रक्षकांनी लक्ष द्यावे.प्रतिबंधित क्षेत्रात विनापरवानगी फोटो, व्हिडीओ शूटिंग केल्यास २ हजार रु. दंड आणि विद्यापीठ परिसरात वाहन शिकवण्यासाठी दुचाकी, चारचाकी आढळून आल्यास ३ हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. नियमांच्या अंमलबजावणीला सोमवारपासून सुरुवात झाल्याचे कुलसचिव डाॅ. भगवान साखळे यांनी सांगितले.

असे असतील निर्बंध
First Published on: January 4, 2023 5:25 PM
Exit mobile version