पुना रुग्णालयातील डॉक्टरची नैराश्यातून आत्महत्या

पुना रुग्णालयातील डॉक्टरची नैराश्यातून आत्महत्या

डॉ. शशिकांत बंब

पुण्यातील पुना रुग्णालयात एका प्रसिद्ध डॉक्टरांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉ. शशिकांत बंब (६३) असे त्यांचे नाव असून त्यांनी आज सकाळी रुग्णालयाच्या विश्रांती कक्षात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही आत्महत्या नैराश्यातून केल्याचे समोर आले आहे. त्यांच्या आत्महत्येमुळे रुग्णालयात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

नेमके काय घडले?

पुण्यातील पुना रुग्णालयातील प्रसिद्ध डॉक्टर म्हणून त्यांची ओळख आहे. डॉ. शशिकांत बंब हे दंत चिकित्सक होते. आज सकाळी डॉ. शशिकांत नेहमीप्रमाणे रुग्णालयामध्ये आले. त्यानंतर ते डॉक्टरांच्या विश्रांती कक्षेत गेले. त्यांच्या सहकाऱ्यांना ते आराम करण्यासाठी गेले असावेत असे वाटले. त्यामुळे त्यांना कोणीही थांबवले नाही. मात्र खूप वेळ झाला तरी देखील डॉ. शशिकांत अद्याप बाहेर आले कसे नाही हे पाहण्यासाठी त्यांचे सहकारी विश्रांती कक्षेत गेले असता त्यांना धक्काच बसला. डॉ. शशिकांत बंब यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे त्यांनी पाहिले. ते दृश्य पाहून त्यांच्या सहकाऱ्यांना धक्काच बसला. ही बाब रुग्णालयात समजताच रुग्णालयात खळबळ उडाली.

सुसाईड नोट सापडली

पुना रुग्णालयातील प्रसिद्ध दंत चिकित्सक डॉ. शशिकांत बंब यांनी विश्रांती कक्षेत गळफास घेऊन आत्महत्या केली त्या ठिकाणी एक सुसाईड नोट सापडली आहे. त्यामध्ये त्यांनी मी निराश होऊन आत्महत्या करत आहे असे लिहीले होते. तसेच याला मी स्वत:च जबाबदार आहे.

First Published on: October 8, 2018 7:53 PM
Exit mobile version