दिलासादायक! ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याच्या नियमांत बदल; RTO च्या फेऱ्या वाचणार

दिलासादायक! ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याच्या नियमांत बदल; RTO च्या फेऱ्या वाचणार

नवे ड्रायव्हिंग लायसन्स काढणाऱ्या वाहनचालकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. कारण आता केंद्र सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याच्या नियमात बदल केले आहेत. ज्यामध्ये नव्या नियमांचा फायदा सर्वसामान्यांना नक्की मिळणार आहे. या नियमांच्या अंमलबजावणीनंतर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) फेऱ्या माराव्या लागणार नाहीत.

केंद्र सरकारने बनवलेले ड्रायव्हिंग लायसन्सचे नवे नियम पूर्वीपेक्षा खूपच सोपे झाले आहेत. ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याच्या सुधारित नियमानुसार, आता तुम्हाला आरटीओला जाऊन कोणत्याही प्रकारची ड्रायव्हिंग टेस्ट द्यावी लागणार नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून 1 जुलै 2022 पासून नवीन नियम लागू केले जातील. त्यामुळे वाहन चालविण्याचा परवाना किंवा लायसन्स मिळविण्यासाठी प्रतीक्षा यादीच्या प्रतीक्षेत असलेल्या कोट्यवधी लोकांना दिलासा मिळणार आहे.

असे मिळवा ड्रायविंग लायसन्स

ड्रायव्हिंग लायसन्स शिकवण्याचा अभ्यासक्रम मंत्रालयाने तयार केला आहे. हे सिद्धांत आणि व्यावहारिक अशा दोन भागात विभागलेले आहे. लाइट मोटर व्हेईकल या अभ्यासक्रमाचा कालावधी चार आठवडे आहे, जो 29 तास चालेल. तर प्रॅक्टिकलसाठी तुम्हाला रस्ते, महामार्ग, शहरातील रस्ते, गावातील रस्ते, रिव्हर्सिंग आणि पार्किंग इत्यादींवर प्रॅक्टिकलसाठी 21 तास द्यावे लागतील. उर्वरित 8 तास तुम्हाला थिअरी शिकवली जाणार आहे.

प्रशिक्षण केंद्रासाठी मार्गदर्शक तत्त्वे


हेही वाचा – राज ठाकरेंच्या केसाला धक्का लागला तर महाराष्ट्र पेटून उठेल; धमकीच्या पत्रानंतर बाळा नांदगावकर यांचा सरकारला इशारा

First Published on: May 11, 2022 2:38 PM
Exit mobile version