पाऊस पडूनही दुष्काळ स्थिती

पाऊस पडूनही दुष्काळ स्थिती

पाऊस पडूनही पुणे जिल्ह्यात दुष्काळ स्थिती

सध्या पाऊसाचे दिवस आहेत. मात्र धो -धो कोसळर्‍या पाऊसाने गेल्या अनेक दिवसांपासुन धडी मारली आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पुणे जिल्ह्यातील नाले, तलाव, बंधारे कोरडे पडले आहेत. त्यामुळे बळीराजा मोठ्या चिंत्तेत आहे.

सह्याद्रीच्या पर्वत रांगा वघळता जुन्नर आंबेगाव, खेड शिरुर या परिसरात तुरळक पाऊस झाला आहे. त्याच पाऊसात खरीप हंगामाची पेरणी झाली. मात्र आता अनेक दिवसांपासून पावसाने धडी मारली आहे. त्यामुळे उन्हाचे चटके वाढत चालले आहेत. खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहे चास-कमान,भामा-आसखेड, डिंबा,माणिकडोह अशी लहान मोठी सर्व धरणे टुडुंब भरल्याने नदीपात्र आणि कालव्यांमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने धरण कालवा परिसर सोडुन अन्य ठिकाणी तलाव, तळी, कोरडीच आहेत. पाऊस नसल्याने खरिपांच्या पिकांची वाढ खुंटली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत पाऊसाची टक्केवारी घटली आहे. आता उर्वरित पावसाळ्याच्या दिवसांत परतीच्या पावसाची अपेक्षा आहे. उत्तर पुणे जिल्ह्यात कांदा हे मुख्य पिक म्हणून पाहिले जाते. पावसाचा अंदाज घेऊन शेतकर्‍यांनी कांद्याच्या रोपांची लागवड केली. मात्र आता कांदा रोपे लागवडीला आली असताना पाऊसाने धडी मारल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. लाखो रुपयांचे भांडवली पिक नष्ट होण्याची शक्यता आहे.


हिंजवडीमध्ये आयटी अभियंत्याची आत्महत्या

विद्यासागर पाथा

पिंपरी । हिंजवडीतील आयटी अभियंत्याने सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. विद्यासागर पाथा असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. हिंजवडी येथील मेगा पॉलिस सोसायटीत ही घटना गुरुवारच्या मद्यरात्री घडली. जगण्यापेक्षा मरण बरं,अशा आशयाची इंग्रजीत लिहिलेली चिट्ठी पोलिसांना आढळली आहे. विद्यासागर पाथा या आयटी अभियंत्याने इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे.तो मूळचा आंध्रप्रदेश येथील असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांनी दिली आहे. तो मेगा पॉलिस सोसायटीमध्ये मित्रांसोबत राहत होता. रोज मित्रांसोबत झोपणारा विद्यासागर त्या रात्री हॉलमध्ये झोपला होता. मात्र सकाळी त्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात खाली आढळला. आठवणीत जगण्यापेक्षा मरण बरं,अशा आशयाची इंग्रजीत लिहिलेली चिट्ठी पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचे उघड होते, असे हिंजवडी पोलिसांनी सांगितले.


पुस्तकरुपी वृक्षावर बाप्पा

पिंपरी-चिंचवड । चौसष्ठ कला,अष्टसिद्धी आणि बुद्धीचे अधिष्ठान ज्याच्या चराचरात सामावलेले आहे. पण अशा लाडक्या गणेशाची पुजा साकारण्यासाठी आपण त्याच चराचर (निसर्ग) सांभाळण्यासाठी आणि संवर्धनासाठी काय करतो? हाच मोठा प्रश्न जगाला भेडसावत असतो. या आनंदोत्सवाच्या निमित्ताने निसर्ग देवतेचच निसर्ग चित्र साकारुन जमेल तेवढा निसर्ग संवर्धनाचा संदेश यातून देवू शकतो. या निमित्ताने नाट्य-पुस्तक-वृक्ष साकारला असून त्यात गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत,असा गणपती चिंचवड मधील अमृता प्रभाकर पवार यांनी साकारला आहे. ज्या पुस्तकांच्यामुळे आपली बुद्धी तल्लख झाली ज्ञान वाढलं आणि आपल्याला माणूसपण लाभले त्याचे प्रतिक म्हणून अमृता यांनी एक मोठा ग्रंथ साकारला आहे. त्यावर जी नावे व अक्षरे कोरली आहेत. ती म्हणजे गेल्या आठ वर्षांपासून अमृता यांच्या ‘थिएटर वर्कशॉप कंपनी’च्या माध्यमातून अनेक एकांकिका, बालनाट्य, दिर्घांक आणि नाटकांची रंगमंचावर साकारलेली गौरवशाली परंपरा मांडली आहे. हा देखावा साकारताना या मध्ये कुठल्याही प्रकारे, प्लास्टिक, थर्माकॉल वा अशा वेगळ्या घटकांचा समावेश यात केलेला नाही.ज्याच्यामुळे निसर्गाची हानी होईल.. तर हा देखावा संपूर्णतः पर्यावरण स्नेही करण्याचा प्रयत्न असल्याचे अमृता पवार (ओंबळे) म्हणाल्या.


स्मार्टपणा दाखविणार्‍या चालकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा बडगा

फोटो प्रातिनिधीक आहे (सौजन्य- फ्रिप्रेसजर्नल)

पुणे । शहरात विविध भागात भरधाव वेगात दुचाकी-चारचाकी वाहने चालवून स्मार्टपणा दाखविणार्‍या चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. महिन्यातभरातच अशा प्रकारे रॅश ड्रायव्हिंग करणार्‍या २३० वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ७७ हजार एवढा दंड वसुल करण्यात आला आहे.दिवसेंदिवस शहरात वाहनांची संख्या वाढत चालली आहे. यातच मध्यवर्ती भागातील अरुंद रस्ते, यातच दुतर्फा पार्क केलेली वाहने यामुळे वाहनांना रस्ते अपुरे पडत चालल्याची स्थिती आहे. अशा परिस्थिीतत जोरदार वाहने चालवणार्‍यांमुळे अपघात होण्याची दाट शक्यता असते. यामुळे वाहतूक पोलिसांकडून अशांवर कारवाई करण्यात येते. शहरातील बहुतांश रस्ते रात्री मोकळे असतात. यामुळे रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांकडून रॅश ड्रायव्हिंगचे प्रमाण जास्त असते. जोशात वाहने चालविताना अपघात घडतात. यात प्रामुख्याने दुचाकीस्वारांची संख्या जास्त आहे. दीडशे, दोनशे सीसीपेक्षा जास्त क्षमतेची वाहने तरुणाईकडे आहेत.

First Published on: September 15, 2018 2:30 AM
Exit mobile version