दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे एसटी झाली ‘हाऊसफूल’

दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे एसटी झाली ‘हाऊसफूल’

नाशिक : काेराेनाचे निर्बंध हटवल्याने यंदा दिवाळीत गावाला आणि पर्यटनस्थळी जाण्यासाठी नागरिकांची मोठी लगबग दिसून येत आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दी.२३) शहरातील नवीन बसस्थानक, महामार्ग बसस्थानक, नाशिकरोड बसस्थानक येथे प्रवाश्यांची मोठी झुंबड दिसून आली. दिवाळीचा सण आणि सुट्ट्याच्या कालावधीत वाढणारी प्रवाश्यांची संख्या लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने यंदाही जादा बसेसचे नियाेजन करण्यात आलेले आहे.

 शाळा, महाविद्यालय, खाजगी, सरकारी कार्यलय, आस्थापणे आदींना दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सुट्टी असल्याने याकाळात एसटीच्या प्रवाश्यांमध्ये मोठी वाढ होत असते. यामुळे एस.टी. महामंडळाकडून प्रवाशांची वाढलेली संख्या लक्षात घेत जादा बसेस साेडण्याचे नियाेजन करण्यात केले आहे.

या मार्गावर सर्वाधिक बसेस

नाशिक-पुणे मार्गावर राेज ९० फेऱ्या तर नाशिक-धुळे मार्गावर दर १५ मिनिटाला बसेस साेडण्यात येणार आहे. दिवाळीच्या कालावधीत जास्तीत जास्त उत्पन्न मिळावे यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. सर्वाधिक प्रवासी असलेल्या नाशिक-पुणे मार्गावर लक्ष केंद्रित करत एसटी बसच्या सर्वाधिक ९० फेऱ्या हाेणार आहेत. याच बराेबर धुळे, मालेगाव, सिन्नर या मार्गावर नवीन बसस्थानक येथून दर १५ मिनिटाला बस साेडण्यात येणार आहे. या सणाेत्सवाच्या काळात अधिकाधिक उत्पन्न मिळावे यासाठी एसटीच्या वतीने कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी कैलास पाटील यांनी दिली.

First Published on: October 24, 2022 2:14 PM
Exit mobile version