हायस्कूलच्या वॉशरूममध्ये व्हिडिओ क्लिप; विद्यार्थींनीची आत्महत्या

हायस्कूलच्या वॉशरूममध्ये व्हिडिओ क्लिप; विद्यार्थींनीची आत्महत्या

व्यभिचारी सूनेचा सर्पदंश करुन सासूने काढला काटा

हैदराबादमधील घटना ताजी असतानाच वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथील परिषद हायस्कुलच्या वॉशरूममध्ये एका १८ वर्षीय विद्यार्थींनीची व्हिडिओ काढून सोशल मीडियावर प्रसारित केल्याची घटना समोर आली आहे. या व्हिडिओमुळे आपली बदनामी होईल या भितीने विद्यार्थींनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मंगरूळपीर पोलीस ठाण्यात दोन युवकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमके काय घडले?

वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथील परिषद हायस्कुलच्या वॉशरूममधील एका १८ वर्षीय विद्यार्थींनीस प्रतीक दिनकर डोंगरे याने वॉशरूममध्ये बोलावले. दरम्यान, दिपक महादेव वानखडे नामक युवकाने दोघांची व्हिडिओ काढून ती मोबाईवर व्हायरल केली. या धक्क्याने पीडितीने आपली समाजात बदनामी होईल या भितीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेची माहिती मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात नोंदवली असून याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. तर एका आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हेही वाचा – स्नॅक्स सेंटरमध्ये अनैतिक प्रकार उघडकीस; दोघांना अटक


 

First Published on: December 6, 2019 9:21 PM
Exit mobile version