बारावीच्या विद्यार्थ्यांचे वाशी येथे आंदोलन

बारावीच्या विद्यार्थ्यांचे वाशी येथे आंदोलन

प्रॅक्टिकल्समध्ये कमी गुण मिळाल्याने बारावीच्या विद्यार्थ्यांनी आज वाशी येथे आंदोलन केले आहे. वाशी येथील परीक्षा मंडळाच्या कार्यालयासमोर आंदोलन केले आहे. बारावीच्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल्समध्ये कमी गुण मिळाल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे.

रिचेकिंगची मागणी

विद्यार्थ्यांनी रिचेकिंगची मागणी करुनही गेल्या पाच दिवसांत बोर्डाकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. कमी गुण मिळाल्याने आवडत्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यास अडचण येणार असल्याची विद्यार्थ्यांची भूमिका आहे. हा गोंधळ संपविण्यासाठी विद्यार्थ्यांनी पालकासह वाशीतील मुंबई परिक्षा मंडळासमोर आंदोलन केले. तर दुसरीकडे ज्यांचे गुण कमी आहेत अशा पुणे विभागातील विद्यार्थ्यांना रीचेकिंग तसेच रीव्हॅल्युशनचे अर्ज भरण्यास सांगण्यात आले आहे. ज्यांचे अर्ज आले आहेत त्यांची प्रकिया सुरु केली असल्याची माहिती मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

First Published on: June 3, 2019 3:09 PM
Exit mobile version