लॉकडाऊन : सिगारेट शेअर नाही केले, म्हणून स्क्रु ड्रायव्हरच खुपसला

लॉकडाऊन : सिगारेट शेअर नाही केले, म्हणून स्क्रु ड्रायव्हरच खुपसला

कल्याण येथील कृषी उत्पन्न बाजार समिती नजीक दोन जणांनी मिळून एका व्यक्तीचा खून स्क्रु ड्रायव्हरचा वापर करून केल्याचे उघडकीस आले आहे. अगदी शुल्लक कारणावरून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे. या दोघांना त्या व्यक्तीने सिगारेट दिले नाही म्हणून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे. पोलिस आता या दोघांचा शोध घेत आहेत.

या घटनेत मृत्यूमुखी पडलेली व्यक्ती ही कल्याणमध्ये एका भाजी विक्रीच्या स्टॉलवर काम करत होती. लॉकडाऊनमध्ये पान टपरीवर सिगारेटचा तुटवडा असतानाच सिगारेट शेअर न केल्याने ही घडला असावी असा कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांचा अंदाज आहे. लॉकडाऊनमुळे अनेक ठिकाणी दुकाने, पान टपऱ्या बंद आहेत. या घटनेतील मृत्यूमुखी पडलेली व्यक्ती ही मूळची उत्तर प्रदेश येथे राहणारी असून अरविंद शंकर कुमार असे या व्यक्तीचे नाव आहे. ही व्यक्ती कल्याणच्या गोविंद वाडी येथे राहत होती. एपीएमसी मार्केटच्या शौचालयाजवळ ही व्यक्त उभी राहून धुम्रपान करत होती. यावेळी हे दोन्ही आरोपी याठिकाणी आले. तसेच दोघांनी सिगारेटची मागणी या व्यक्तीला केली. पण सिगारेट देण्यासाठी नकार दिला. सिगारेटसाठी नकार दिल्याने राग अनावर झाल्यानेच या व्यक्तीचा स्क्रु ड्रायव्हर वापरून खून करण्यात आला. या व्यक्तीच्या छातीवर, पोटात स्क्रु ड्रायव्हर खुपसल्याने या व्यक्तीच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला. त्यानंतर या व्यक्तीला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पण या घटनेतील जखमा पाहून लगेचच परळच्या केईएम हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. पोलिसांनीही या घटनेत स्क्रु ड्रायव्हरचा वापर झाल्याची नोंद करत गुन्हा दाखल केला आहे.

First Published on: March 27, 2020 2:59 PM
Exit mobile version