तुम मुझे कैसे रोकोगे म्हणत पंकजा मुंडेंची शेरो शायरी; पण रोखणारे हात कोणाचे पक्षातले की विरोधक?

तुम मुझे कैसे रोकोगे म्हणत पंकजा मुंडेंची शेरो शायरी; पण रोखणारे हात कोणाचे पक्षातले की विरोधक?

दसऱ्याच्या निमित्ताने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची भगवानगडावरुन तोफ धडाडली. यावेळी पंकजा मुंडे यांनी शायराना अंदाजात त्यांच्या विरोधकांना इशारा दिला आहे. अपनी हद रोशन करने से, तुम मुझे कैसे रोकोगे, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी इशारा दिलाय. पण त्यांना रोखणारे हात नेमके कोणाचे आहेत? त्यांना रोखणारे हात हे पक्षातील आहेत की विरोधकांचे हे मात्र गुलदस्त्यात ठेवलं.

पंकजा मुंडे यांनी हेलिकॉप्टरमधून भगवानगडावर पोहोचल्या. मला वाटलं मी इथे येऊ शकणार नाही. येताना माझ्या मनात चारोळ्या आल्या. तुम मुझे कब तक रोकोगे? जानकर साहेब भाषण करताना इंग्रजीत बोलत होते. ओबीसी माणूस पेटला तर इंग्रजीत बोलतो. मध्येच हिंदी बोलतात. कारण त्यांना देशाची लिडरशीप आहे, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी शायरी बोलून दाखवली.

तुम मुझे कब तक रोकोगे,
मुठ्ठी में कुछ सपने लेकर जेबो में आशाए,
दिल में अरमान यहीं कुछ करजाए,
सुरज सा तेज नहीं मुझ में,
दिपकसा जलता देखोगे,
तुम मुझे कब तक रोकोगे,
अपनी हद रोशन करने से,
तुम मुझे कैसे रोकोगे, कैसे टोकोगे,

मंत्रिपद भाड्यावर टाकून फिरतायत

पंकजा मुंडे यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. मंत्रिपद भाड्यावर टाकून फिरतायत, अशी घणाघाती टीका पंकजा मुंडे यांनी केली आहे. तुम्ही चागंलं, जनतेच्या हिताचं काम करा आम्ही जाहीरपणे तुमचे अभिनंदन करु. पण आज राज्यात काय परिस्थिती आहे. स्त्रियांचे प्रश्न वाढलेत, रोज पेपर उघडला, टीव्ही लावली की बलात्काराच्या घटना दिसतात. काय चालंलय महाराष्ट्रात? महिलांवर अत्याचार होत असतात त्यावर जबाब विचारायचा नाही का? असा संतप्त सवाल पंकजा मुंडे यांनी केला.

 

First Published on: October 15, 2021 5:54 PM
Exit mobile version