करुणा शर्मा-मुंडे घेणार भगवान गडावर दसरा मेळावा, पुण्यात केली घोषणा

करुणा शर्मा-मुंडे घेणार भगवान गडावर दसरा मेळावा, पुण्यात केली घोषणा

पुणे – राज्यात दसरा मेळाव्यावरून उद्धव ठाकरेच्या शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटात संघर्ष सुरू आहे. यातच आणखी एक वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा शर्मा-मुंडे यांनी आपण भगवान गडावर दसरा मेळावा घेणार असल्याची घोषणा केली आहे. याबाबत पुण्यात  माहिती दिली.

मी देखील वंजारी समाजाची सून असून मुंडेंच्या एकुलत्या एक वंशाचा दसऱ्याच्या दिवशी वाढदिवस आहे. यामुळे मी भगवान गडावर दसरा मेळावा घेणार आहे. 7 ते 8 वर्षांपासून भगवान गडावर दसरा मेळावा होत नाही. जी दसरा मेळाव्याची परंपरा खंडित झाली आहे. ती परंपरा यंदा परत सुरू करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. दरम्यान, भगवान गडाशी संबंधित नागरिकांनी मला दसरा मेळाव्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती करुणा शर्मा-मुंडे यांनी केली आहे.

पंकजा मुंडे आणि दसरा मेळाव्याचा वाद –

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याकडून भगवान गडावर घेण्यात येणाऱ्या दसऱ्या मेळाव्यावरून काही वर्षांपूर्वी मोठे वाद निर्माण झाले होते. त्यानंतर पंकजा मुंडे यांना मेळाव्याच् ठिकाणही बदलावे लागले होते. गेल्या काही वर्षांपासून पंकजा मुंडे संत भगवान बाबांच्या जन्मगावी सावरगाव या ठिकाणी दसरा मेळावा घेत आहेत. अशातच करुणा शर्मा-मुंडेंनी भगवान गडावर दसरा मेळावा घेण्याची घोषणा केल्याने राज्यातील बहुचर्चित दोन्ही दसरा मेळाव्यांबाबत राजकारण तापणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

First Published on: September 13, 2022 12:23 PM
Exit mobile version