कमवती पत्नी देखील मागू शकते पोटगी – उच्च न्यायालय

कमवती पत्नी देखील मागू शकते पोटगी – उच्च न्यायालय

तृतीयपंथीयही कराणार गुन्हा दाखल

कमवत्या पत्नीला देखील पोटगीचा हक्क आहे असा निलाक मुंबई उच्च न्यायालयानं दिला आहे. एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं हा निकाल दिला आहे. यावेळी न्यायालयानं पत्नी कमवती आहे म्हणू तिचा पोटगीचा हक्क जात नाही. नवरा – बायकोमधील संबंधामध्ये भांडणं होण्यापूर्वी तिचं राहणीमान कसे होते? आणि घटस्फोटाची प्रक्रिया सुरू असताना ती पूर्वीप्रमाणे राहू शकते का नाही? हे पोटगी देताना पाहणे गरजेचं आहे असं न्यायालयानं म्हटलं आहे.

५ जानेवारी २०११ मध्ये वांद्रे कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी एक अर्ज आला. त्यावेळी पत्नीनं आपल्या मालमत्तेविषयीची माहिती लपवली. शिवाय, पत्नी फ्रेंच भाषेची शिकवणी घेत असल्याने कमावती आहे. यामुळे कौटुंबिक न्यायालयाने १३ मे २०१६ पत्नीचा अर्ज फेटाळून लावला. त्याविरोधात अॅड. राजेंद्र पै यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यावेळी न्यायालयानं  कौटुंबिक न्यायालचा निर्णय रद्द ठरवला. तसेच या प्रकरणातील पत्नीला ५ जानेवारी २०११ पासून दरमहा ७५ हजार रुपये याप्रमाणे थकबाकी द्यावी. शिवाय, तेवढ्याच रकमेची अंतरिम पोटगी दरमहा देत राहावे असा आदेश देखील मुंबई उच्च न्यायालयानं दिला.

पत्नी कमवती आहे. तिच्याकडे एक कोटीचे दागिने आहेत. तसेच खारमध्ये एका मोठ्या फ्लॅटचा मालकी हक्कही आहे. असा युक्तीवाद देखील यावेळी करण्यात आला होता. शिवाय पतीचे उत्पन्न केवळ २० हजार रूपये प्रति महिना आहे असा युक्तीवाद देखील करण्यात आला. पण, उपलब्ध माहितीच्या आधारे पतीचे उत्पन्न केवळ २० हजार रूपये प्रति महिना आहे हे खोटं असल्याचं निरिक्षण न्यायालयानं नोंदवलं. त्यानंतर कमवत्या पत्नीला देखील पोटगीचा हक्क आहे असा निकाल मुंबई उच्च न्यायालयानं दिला.

First Published on: December 10, 2018 10:02 AM
Exit mobile version