“एकावे ते नवलच” : तरंगणार्‍या फरशीवर उभे असलेले आणि शिल्पकाराच्या नावाने प्रसिद्ध मंदिर

“एकावे ते नवलच” : तरंगणार्‍या फरशीवर उभे असलेले आणि शिल्पकाराच्या नावाने प्रसिद्ध मंदिर

मंदिरांचे नाव त्यामध्ये विराजमान असणार्‍या देवतांच्या नावाने ठेवली जातात. परंतु भारतात असे देखील एक मंदिर आहे, ज्याचे नाव त्या मंदिराला बनवणार्‍याच्या नावावर ठेवण्यात आले आहे, असे मानले जाते की असे वैशिष्ट्य असणारे कदाचित जगातील हे एकमेव मंदिर असेल.

तेलंगणातील मुलुगू जिल्हयातील वेंकटापूर विभागातील पालमपेट हे रामप्पा मंदिर म्हणून ओळखले जाते, रामप्पा मंदिर रामलिंगेश्वर मंदिराच्या नावानेही ओळखले जाते. मंदिराचे मुख्य शिल्पकार रामप्पा यांचे नाव या मंदिराला देण्यात आले आहे. मुख्य शिल्पकाराचे नाव देण्यात आलेल्या जगातील मोजक्या मंदिरांपैकी हे एक आहे. उपलब्ध माहितीनुसार हे मध्यकालीन दाक्षिणात्य मंदिर इ.स.पूर्व 1213 मधील आहे.

मुख्य सेनापती रुद्र समानी यांच्या संरक्षणात काकातिया राज्यकर्ते गणपती देवा यांनी अतुकुरू प्रांतातली रानाकुडे येथे हे मंदिर बांधले आहे. या मंदिराची स्थापत्यशैली आश्चर्यचकीत करणारी आहे. मंदिराच्या भिंती, खांब आणि छतावरील नक्षिकाम अत्यंत सुरेख आहे. या मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे, बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या विटा वजनाने अत्यंत हलक्या पण कठीण आहेत. या विटा पाण्यावर तरंगतात. आयाताकृती सहा फूट उंच व्यासपीठावर हे मंदिर उभारण्यात आले आहे. हे व्यासपीठ उभारण्यासाठी जवळपास 40 वर्षांचा कालावधी लागला होता. आता हे मंदिर युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत सामावेश करण्यात आला आहे.

First Published on: November 29, 2022 7:45 PM
Exit mobile version