मंत्रीपदासाठी वरिष्ठ नेतृत्वाची भेट घ्यावी, एकनाथ खडसेंचा पंकजा मुंडेंना सल्ला

मंत्रीपदासाठी वरिष्ठ नेतृत्वाची भेट घ्यावी, एकनाथ खडसेंचा पंकजा मुंडेंना सल्ला

'या' लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडे उमेदवारच नाही, Eknath Khadse यांची माहिती

शिंदे सरकारचा मंत्रिमडळ विस्तार तब्बल ३९ दिवसांनी पार पडला. शिंदे गट-भाजप असे मिळून १८ मंत्र्यांनी पदाची शपथ घेतली. मात्र, काही मंत्र्यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे अद्यापही काही नेत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. भाजपमध्ये नाराजीनाट्य रंगण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना स्थान न मिळाल्यामुळे मुंडे समर्थक प्रचंड नाराज झाले आहेत. दरम्यान, मंत्रीपदासाठी वरिष्ठ नेतृत्वाची भेट घ्यावी, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे यांना दिला आहे.

एकनाथ खडसेंनी प्रसार माध्यमांशी संवाद साधल्यानंतर एकनाथ खडसे म्हणाले की, भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना डावलण्याचे प्रकार अनेकदा झाले आहेत. अलीकडच्या काळात गोपीनाथ मुंडे यांच्या परिवाराशी संबंधित जे लोक आहेत, त्यांना डावलले जात आहे. पंकजा मुंडे यांच्यावर सातत्याने अन्याय होत आहे. आता देखील त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारात घेतील की नाही, याबाबत शंका वाटते. परंतु त्यांनी मंत्रिमंडळात येण्यासाठी काही काळ वाट न पाहता वरिष्ठांना भेटावे, असं एकनाथ खडसे म्हणाले.

गोपीनाथ मुंडे साहेबांसोबत मी सुद्धा होतो. भाजपमध्ये जी लोकं मुंडेंच्य जवळ होते. ते आता बाजूला पडले आहेत. पुढील काळात त्यांना न्याय मिळेल, अशी आशा एकनाथ खडसेंनी व्यक्त केली आहे. कारण मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार ४० दिवसांनी झाला. आता पालकमंत्र्यांच्या नियुक्तीसाठी आणखी किती वेळ लागेल, हे माहिती नाही, असा खोचक टोला देखील खडसेंनी राज्य सरकारला लगावला आहे.

दरम्यान, भाजपामध्ये असताना एकनाथ खडसे यांना देखील मंत्रीपदासाठी डावलण्यात आलं होतं. त्यांनी देखील पीएम नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. मात्र, त्यांनी एकनाथ खडसेंची दखल घेतली नव्हती. एकप्रकारे त्यांना डावलण्यात आलं होतं. दुसरीकडे त्यांनी पंकजा मुंडे यांना मंत्रीपदासाठी वरिष्ठ नेतृत्वाची भेट घ्यावी, असा सल्ला दिला आहे. त्यामुळे पंकजा मुंडे वरिष्ठ नेतृत्वाची भेट घेणार का, हे पाहणं महत्त्वाचं आहे.


हेही वाचा : आम्ही बापूंमुळेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अनुभवतोय, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं प्रतिपादन


 

First Published on: August 12, 2022 12:44 PM
Exit mobile version