मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटाला धक्का; माजी नगरसेविका पुन्हा उद्धव ठाकरे गटात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटाला धक्का; माजी नगरसेविका पुन्हा उद्धव ठाकरे गटात

गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाला लागलेली गळती अद्याप थांबायचे नाव घेत नव्हती. अशताच शिंदे गटाला ठाण्यात धक्का बसला आहे. ठाण्यात शिंदे गटातील माजी नगरसेविकेने पुन्हा उद्धव ठाकरेंना भेटून स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला आहे. माजी नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी आणि भास्कर शेट्टी यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. (Eknath Shinde group Former corporator Ragini BairiSetty returns to Uddhav Thackeray Shiv Sena group)

‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन बैरीशेट्टी कुटुंबाने उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आहे. माजी नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी यांनी ठाकरे गटात घरवापसी केल्यामुळे निवडणुकीच्या आधीच शिंदे गटाला धक्के बसायला सुरुवात झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

नुकतंच शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका ज्योती माने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सहकाऱ्यांसह शिंदे गटात प्रवेश घेतला.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडाळी पुकारल्यानंतर शिवसेनेत उभी फुट पडली. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर 40 आमदार, 12 खासदार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर ठाकरे आणि शिंदे गटाच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यास सुरूवात केली.


हेही वाचा – मारहाण करून ‘हर हर महादेव’चा शो बंद पाडल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांना अटक

First Published on: November 11, 2022 3:53 PM
Exit mobile version