आमदार संजय शिरसाट यांना ह्रदयविकाराचा झटका, उपचारांसाठी औरंगाबादहून मुंबईत दाखल

आमदार संजय शिरसाट यांना ह्रदयविकाराचा झटका, उपचारांसाठी औरंगाबादहून मुंबईत दाखल

शिंदे गटातील औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान त्यांना उपचारांसाठी आता औरंगाबादहून मुंबईला आणण्यात आले आहे. एअर अॅब्युलन्सने संजय शिरसाट यांना मुंबईला आणण्यात आले आहे. मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केले जातील अशी माहिती देखील समोर आली आहे.

शिरसाट यांना काल दुपारी प्रकृती अवस्थ वाटल्याने औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले होते. मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने आज सकाळी तातडीने उपचारांसाठी मुंबईला आणण्यात आले आहे. औरंगाबाद विमानतळावर संजय शिरसाट यांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या 40 हून अधिक बंडखोर आमदारांमध्ये संजय शिरसाटही होते. यानंतर शिंदे यांनी भाजपसोबत मिळत सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार केला, मात्र या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने गेल्या अनेक दिवसांपासून आमदार संजय शिरसाट नाराज असल्याची चर्चा सुरु झाली. संजय शिरसाट यांनीही ही नाराजी अनेक वेळा बोलून दाखवली, या नाराजीमुळे ते पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटात सामील होणार असल्याच्याही चर्चा रंगल्या.

संजय शिरसाट हे शिवसेनेतून निवडणून आलेले आमदार आहेत. मात्र ते आता शिंदे गटात सामील झाले आहेत. औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून ते विधानसभेवर तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये सलग तीन वेळा ते विधानसभेवर निवडून आले आहेत.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह टिपण्णी करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

First Published on: October 18, 2022 8:44 AM
Exit mobile version