गड किल्ल्यांच्या जतन आणि संवर्धनासाठी विशेष कृती आराखडा तयार होणार, मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही

गड किल्ल्यांच्या जतन आणि संवर्धनासाठी विशेष कृती आराखडा तयार होणार, मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही

मुंबई – गड किल्ल्यांचे जतन आणि संवर्धनाबाबत राज्यभरातील दुर्गप्रेमी तरुणांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन केल. त्याची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट आझाद मैदान गाठले. आंदोलकर्त्यांची भेट घेतली. गड किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी विशेष कृती आराखडा तयार केला जाईल, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.


राज्याच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या गड किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील दुर्गप्रेमी तरुणांनी आंदोलन केले होते.

मुख्यमंत्र्यांनी या आंदोलनकर्त्या तरुणांशी संवाद साधून थेट आझाद मैदानात त्यांची भेट घेतली. त्यांचे निवेदन स्वीकारले. गड किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी राज्य शासनाची सकारात्मक भूमिका असून त्यासाठी विशेष कृती आराखडा तयार केला जाईल, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. यावेळी खासदार राहुल शेवाळे आणि राज्यभरातून आलेले अनेक शिवप्रेमी उपस्थित होते.

First Published on: September 18, 2022 8:51 PM
Exit mobile version