शिंदे गटाची रणनिती हिंदू पंचागानुसार

शिंदे गटाची रणनिती हिंदू पंचागानुसार

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath shinde) ४० हून अधिक आमदारांसह २२ जूनपासून गुवाहटीतील हॉटेलमध्ये मुक्काम ठोकून आहेत. ते केव्हा मुंबईत परतणार याकडे सगळेजण लक्ष ठेऊन आहेत. मात्र शिंदेगट २९ जूनपर्यंत हॉटेल सोडू शकणार नाही. कारण शिंदेगटाची रणनिती ही हिंदू पंचागानुसार करण्यात येत असून २९ जूनला अमावस्या आहे. यामुळे शिंदेगट अमावस्यानंतरच पुढचे पाऊल उचलणार आहे. यामुळे शिंदे गट ३० जूननंतरच शक्ती परिक्षेची मागणी करण्याची शक्यता आहे.

शिंदेगट गुवाहटीतील पंचतारांकीत रैडिसन ब्लू या हॉटेलमध्ये आपला वेळ व्यतित करत आहे. पण त्यांच्या बंडखोरीमुळे महाराष्ट्र पेटला असून शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असे शिवसैनिकांचे दोन गट पडले आहेत. राजकीय तज्ज्ञांच्या मते मराठी माणसांमध्ये पडलेली ही फूड महाराष्ट्राला परवडणारी नाही. कारण याचा फायदा तिसऱ्याच व्यक्तीला होणार आहे.

तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते संजय राऊत , पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या जेष्ठ नेत्यांकडून सातत्याने शिंदेगटावर हल्लाबोल केला जात आहे. यामुळे शिंदे गटाची शिवसेनेत परत येण्याची शक्यताही मावळली आहे. त्यातच आता शिंदेगटाने उद्धव ठाकरे यांना थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले . पण हे सर्व सुरू असतानाच गुवाहटीतून शिंदे महाराष्ट्रातील हालचालींकडे लक्ष ठेवून आहेत. शिंदेगटाच्या या स्मार्ट मूव्ह मागे भाजप असल्याचा बोलबाला आहे. पण त्याचबरोबर शिंदे यांचे सगळे निर्णय हिंदू पंचागाला समोर ठेवून घेतले जात असल्याचे समोर आले आहे.

२२ जूनला शिंदे काही आमदारांना घेऊन सूरतला गेले. तिथून ते फ्लाईटने आसामला गेले. त्यानंतर हळूहळू एक एक आमदार गुवाहटीत दाखल झाला. ही सर्व हालचाल पंचागानुसार सूरू होती अशी माहीती आता पुढे येत आहे. २९ जूनला अमावस्या असल्याने या दिवशी कुठलेही शुभ कार्य करत नाहीत. यामुळे शिंदे गटाने ३० जूनपर्यंत हॉटेलमधला मुक्काम वाढवला आहे. हॉटेलनेही ३० जूनपर्यंत नवीन बुकींग घेणे बंद केले आहे.

First Published on: June 27, 2022 6:32 PM
Exit mobile version