Eknath Shinde : दिल्लीत येणं जाणं सुरूच असतं; मंत्रिमंडळ विस्तारावर प्रतिक्रिया

Eknath Shinde : दिल्लीत येणं जाणं सुरूच असतं; मंत्रिमंडळ विस्तारावर प्रतिक्रिया

 

नवी दिल्लीः दिल्लीत येणं जाणं सुरुचं असतं. त्यात नवीन असं काही नाही. महाराष्ट्रात अनेक प्रकल्प सुरु आहेत. त्यासाठी केंद्र सरकारचं मार्गदर्शन आणि सहाकार्य मिळत असतं, अशी प्रतिक्रिया मुख्यमिंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत दाखल होताच दिली.

हेही वाचाःसुलोचना दीदींचं निधन : चित्रपटसृष्टीवर मायेची पाखर घालणारी ‘आई’ हरपली – मुख्यमंत्री शिंदे

मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्लीत दाखल होताच केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी भेट घेतली. त्याआधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मंत्रिमंडळ विस्तारासाठी तुम्ही दिल्लीत दाखल झाला आहात का?, असा प्रश्न मुख्यमंत्री शिंदे यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, दिल्लीत माझं येणं जाणं सुरुचं असतं. अनेक महत्त्वाचे प्रकल्प सध्या महाराष्ट्रात सुरु आहेत. त्यासाठी केंद्र सरकारचे मार्गदर्शन आणि सहकार्य मिळत असतं. त्यामुळेच दिल्लीत आलो आहे. कसं आहे समविचारी पक्ष एकत्र आले की विकास निश्चितच होत असतो.

मुख्यमंत्री शिंदे, शरद पवारांच्या भेटीने चर्चेला उधाण

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे १ जून २०१३ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीकरिता वर्षा निवासस्थानी दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये झालेली भेट ही राजकीय भेट असल्याचे स्वतः मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आले आहे. ही भेट सदिच्छा भेट होती. तर शरद पवार अध्यक्ष असलेल्या मराठा मंदिर संस्थेच्या अमृत महोत्सव कार्यक्रमासाठीचे आमंत्रण देण्यासाठी शरद पवार हे वर्षा बंगल्यावर आले होते, असे मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.

आषाढी वारीच्या नियोजनासाठी १० कोटींची तरतूद

पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी चोख नियोजन करण्यात यावे. तसेच वारकरी बांधवांना कोणतीही अडचण येऊ नये, याची काळजी घ्या, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  दिले आहेत. एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले की, पंढरपूर आषाढी वारीसाठी निधीची कोणतीही कमतरता नाही. अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे नगरपालिकेसाठीच्या निधीत ५ वरून १० कोटींची आणि ग्रामपंचायतींकरिता २५ वरून ५० लाख रुपयांची अशी दुप्पट तरतूद केली आहे. याशिवाय रस्त्यांसाठीही वेगळा निधी दिला आहे.  वारी मार्गावरील पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना देण्यात येणारा निधी दुप्पट केला आहे, तत्काळ वितरीत करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली. पंढरपूर आणि परिसरातील रस्ते वारीसाठी सुस्थितीत व्हावेत यासाठी १० कोटी रुपयांचा निधी दिला आहे.

 

First Published on: June 4, 2023 10:45 PM
Exit mobile version