केंद्र सरकारची मदत तुटपुंजी, राज्याला भरीव मदत करण्याची एकनाथ शिदेंची मागणी

केंद्र सरकारची मदत तुटपुंजी, राज्याला भरीव मदत करण्याची एकनाथ शिदेंची मागणी

राज्यात अतिवृष्टीमुळे पुरपरिस्थिती निर्माण झाली असून यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांचे, शेतकऱ्यांचे आणि घरांचे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने पूरग्रस्तांना प्रत्येकी १० हजार रुपयांची तात्काळ मदत जाहीर केली आहे. परंतू येत्या दोन दिवसांत मदत पॅकेजची घोषणा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहेत. केंद्र सरकारने केलेली मदत तुटपुंजी आहे. केंद्र सरकारने भेदभाव न करता राज्याला भरीव मदत करावी अशी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. तसेच राज्य सरकार एनडीआरएफच्या निकषांच्या बाहेर जाऊन पूरग्रस्तांना संपुर्ण मदत करणार असल्याचे आश्वासनही मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाध साधला यावेळी केंद्रावर निशाणा साधला आहे. केंद्र सरकारने केलेली मदत तुटपुंजी असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. राज्य सरकारच्या वतीने राज्यमंत्रिमंडळात पूरग्रस्त नागरिकांना प्रत्येकी १० हजार रुपये देण्याचा निर्णय झालेला आहे. हा निधी नागरिकांच्या खात्यामध्ये जमा होईल. पूरग्रस्त भागातील पंचनामे झाल्यावर राज्य सरकारच्या वतीने अधिकची मदत देखील दिली जाईल. ज्या घरांची, मालमत्तेची पडझड झाली असेल त्यांना एनडीआरएफच्या निकषांच्या बाहेर जाऊन संपुर्ण मदत दिली जाणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

पॅकेज आणि मदत हा विषय आता सरकारसाठी महत्वाचा नाही आताचा वेळ हा लोकांच्या मदतीसाठी धावून जाण्याचा आहे. त्यामुळे पूरग्रस्त नागरिकांना मदत करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून मदत कार्य सुरु आहे. मुंबई, पुणे आणि इतर महापालिका काम करत आहेत. मदत करत आहेत असे देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तसेच मदतीवरुन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे. केद्र सरकारने दिलेली मदत तुटपुंजी आहे. राज्याला भरीव मदत मिळाली पाहिजे. यामुळे केंद्र सरकारने कोणताही भेदभाव न करता मदत दिली पाहिजे असे म्हणत केंद्र सरकारने मोठा भाऊ म्हणून जबाबदारी घेण्याचे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

First Published on: July 31, 2021 11:16 AM
Exit mobile version