Electricity Bill Hike: सर्वसामान्यांना मोठा शॉक! वीज दरात प्रति युनिट इतक्या रुपयांची वाढ

Electricity Bill Hike: सर्वसामान्यांना मोठा शॉक! वीज दरात प्रति युनिट इतक्या रुपयांची वाढ

सर्वसामान्यांना मोठा शॉक! वीज दरात प्रति युनीट इतक्या रुपयांची वाढ

मुंबई: राज्यातील तापमानात वाढ होत आहे. उन्हाचा पारा दिवसेंदिवस चढत आहे, नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. अनेक ठिकाणी तापमान 40 अंशसेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. पंखे, एसी, कुलर यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. अशा ऐन उन्हाळ्यात सर्वसामान्यांना वीज दरवाढीचा शॉक बसला आहे. अदानी वीज कंपनीची वीज महागली आहे. त्याचा फटका जवळपास 30 लाख वीज ग्राहकांना बसणार आहे.(Electricity Bill Hike in Mumbai from May 2024 Adani power consumers to pay more)

अदानी कंपनीने गतवर्षी झालेल्या इंधन खर्चातील 318 कोटी 38 लाख रुपयांची वाढ वसूल करण्यासाठी राज्य ऊर्जा नियामक आयोगाकडे आदरपूर्वक प्रस्ताव सादर केला असता याबाबत आयोगाने सोमवारी मान्यता दिली. ही रक्कम इंधन अधिभारातून मे ते 24 या काळात ग्राहकांकडून वसलू केली जाणार आहे. वाणिज्य, औद्योगिक आणि इतर ग्राहकांसाठी, इंधन अधिभार वापरानुसार निर्धारित केला जाईल.

इतक्या रुपयांची झाली वाढ (Electricity Bill Hike) 

मे महिन्याच्या बिलापासून निवासी ग्राहकांच्या इंधन अधिभारात प्रति युनिट 70 पैसे ते 1.70 रुपये इतकी मोठी वाढ होणार आहे. मे महिन्यापासून दरमहा 0-100 युनिट वीज वापर असणाऱ्या निवासी ग्राहकांकडून प्रति युनिट 70 पैसे, 101-300 युनिटसाठी 1.10 रुपये, 301-500 युनिटसाठी 1.5 रुपये आणि 500 हून अधिक वीज वापरासाठी 1.70 रुपये इंधन अधिभार आकारण्यात येणार आहे.

वीज दरवाढीमागे कारण

वीजेच्या दरात वाढ करण्यात येणार आहे. मागील वर्षी इंधन खर्चात वाढ झाली होती. इंधनाच्या खर्चात वाढ झाली मात्र वीजेच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली नाही. त्यामुळे कंपन्यांचे नुकसान होत आहे. यामुळे राज्य वीज नियामक आयोगापुढे अदानी कंपनीने इंधन खर्चातील वाढ वसूल करण्यासाठी 318 कोटी 38 लाखांचा प्रस्ताव सादर केला होता. याला आयोगाने मंजूरी दिली आहे. त्यामुळे अधिकचा भार ग्राहकांकडून मे ते ऑगस्ट 24 या काळात वसूल केला जाणार आहे.

महाराष्ट्रात सर्वात महागडी वीज

दक्षिणेकडील राज्यांमध्ये काही महिन्यांपूर्वीच वीजदरवाढ करण्यात आली. त्यानंतर उत्तरेकडील राज्यांमध्येही असाच निर्णय घेण्यात आला होता. पण महाराष्ट्राचा विचार केला तर वीजदरवाढ करण्यात आल्यामुळे महाराष्ट्र हे सर्वात महागडी वीज मिळणारं राज्य ठरलं आहे. आंध्र प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, गोवा, तेलंगणा, गुजरात आणि मध्य प्रदेशच्या तुलनेत महाराष्ट्रातील वीजेचा दर जास्त असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

(हेही वाचा: Lok Sabha 2024 : नाशिकचा तिढा सुटता सुटेना; भुजबळ म्हणतात, राष्ट्रवादीचा दावा आजही कायम)

 

Edited By- Prajakta Parab 

First Published on: April 23, 2024 4:13 PM
Exit mobile version