अकरावी प्रवेश: जागा जास्त, विद्यार्थी कमी

प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबईसह राज्यात सुरू असलेल्या अकरावी प्रवेश प्रक्रियेत यंदा विद्यार्थी संख्या घटल्याचे चित्र पहायला मिळाले. राज्य शिक्षण मंडळाच्या एसएससी बोर्डाचा निकाल यंदा खालवल्याने त्याचा थेट फटका अकरावी प्रवेशावर बसल्याचे दिसून आले आहे. मुंबईत सुरू असलेल्या नोंदणीत आतापर्यंत २ लाख २९ हजार २५९ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली असल्याची माहिती समोर आली आहे. ही विद्यार्थी संख्या गतवर्षीच्या तुलनेत २० हजारांनी घटली असल्याची माहिती समोर आली आहे. तर नाशिक विभागातही आतापर्यंत २६ हजार ४२९ विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी केली असून ही विद्यार्थी संख्या देखील गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी असल्याची नोंद शिक्षण विभागाकडून करण्यात आली आहे.

दहावी बोर्डाच्या निकालात यंदा निकालाची सूज कमी झाल्याने राज्याचा एकूण निकालात कमालीची घसरण पहायला मिळाली. दहावी परीक्षेत अंतर्गत गुण रद्द केल्याने यंदा राज्य शिक्षण मंडळाचा निकाल घसरला. मुंबई विभागाचा निकाल 77.04 टक्के लागला. मुंबई विभागातून दहावी परीक्षा 3 लाख 57 हजार 055 विद्यार्थ्यांनी दिली होती. यापैकी 2 लाख 75 हजार 071 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत राबविण्यात येणार.

मुंबई महानगर प्रदेशातील अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. शिक्षण विभागाने प्रथम जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना 29 जूनपर्यंत अर्ज करता येणार होते. शिक्षण विभागाने ही मुदत वाढवून प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे.

शनिवारी (ता.29) अकरावी प्रवेशासाठी 2 लाख 29 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर 1 लाख 19 हजार 490 विद्यार्थ्यांनी अर्जाचा दुसरा भाग भरला होता. दहावी निकालानंतर करिअरच्यादृष्टीने विद्यार्थी विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात. विद्यार्थी प्रवेश इतर अभ्यासक्रमांना घेण्यासाठी प्रयत्न करत असताना अकरावी प्रवेशाची नोंदणीही करून ठेवतात. त्यामुळे दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या जवळपास संख्येने विद्यार्थी दरवर्षी नोंदणी करतात. परंतु यंदा निकाल घसरल्याने नोंदणीची संख्या घसरली आहे. विद्यार्थ्यांना 4 जुलैपर्यंत अर्ज भरता येणार असल्याने यामध्ये काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.

नाशिकमध्येही बिकट परिस्थिती
दरम्यान, नाशिक विभागाच्या आकडेवारीवर नजर टाकली असता शनिवार संध्याकाळपर्यंत अकरावी प्रवेशासाठी २६ हजार ४२९ विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी नोंदणी पूर्ण केली आहे. त्यात एकूण २३ हजार १७० विद्यार्थ्यांनी आपले अर्ज पूर्ण करुन घेतले असून अद्याप १ हजार १० विद्यार्थ्यांचे अर्ज अपूर्ण अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे. यंदा नाशिक विभागातून एकूण १ लाख ७४ हजार ८९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. त्या तुलनेत नाशिक विभागातून पूर्ण झालेली नोंदणी अल्प असल्याने शिक्षण तज्ज्ञांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तर पुणे विभागातही आतापर्यंत नोंदणी आकडा हा ८३ हजारांवर पोहचला आहे. तर यंदा पुण्यातून उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या ही २ लाख ४६ हजार ८५५ इतकी आहे.

First Published on: July 2, 2019 4:09 AM
Exit mobile version