नाशिक दिल्ली विमानाचे इमर्जन्सी लॅण्डिंग

नाशिक दिल्ली विमानाचे इमर्जन्सी लॅण्डिंग

दिल्लीहून नाशिककडे उड्डाण घेतलेल्या स्पाईस जेट कंपनीच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने या फ्लाईटचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. ही बाब वेळीच लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली. त्यामुळे पुन्हा एकदा स्पाईस जेटच्या विमानांच्या सुरक्षेचा प्रश्न पुढे आला आहे.

स्पाईस जेटच्या माध्यमातून ऑगस्टपासून नाशिक दिल्ली विमानसेवा सुरू करण्यात आली. नाशिककरांचा या सेवेला चांगला प्रतिसाद लाभत आहे. 10 ऑगस्टपासून नव्या वेळेत ही फ्लाईट सुरू झाली होती. नियोजीत वेळेनुसार बी 737 फ्लाइट एसजी 8363 ने सकाळी 7.56 मिनिटांनी विमानाने दिल्लीतून नाशिककडे उड्डाण केले. मात्र स्पाइसजेटच्या फ्लाइटमधील ‘ऑटोपायलट’ मधील बिघाडामुळे दिल्लीला परतावे लागले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. वैमानिकाने यशस्वी लँडिंग केल्याने प्रवाशांचा जीव भांड्यात पडला.

पुन्हा एकदा सुरक्षेचा मुददा ऐरणीवर
स्पाईसजेटचा यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) एअरलाइनला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर आजच्या घटनेने पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हवेत ऑटो पायलट सिस्टीममध्ये बिघाड झाल्याने मोठी दुर्घटना घडू शकते, यामुळे कंपनीने उपाययोजना करण्याचे सुचविले आहे. तसेच यापूर्वी जुलैमध्ये एव्हिएशन वॉचडॉगने म्हटले होते की स्पाइसजेट सुरक्षित, कार्यक्षम आणि विश्वासार्ह हवाई सेवा देण्यात अपयशी ठरली आहे. अशा परिस्थितीत त्यांच्यावर कारवाई का करू नये, असा इशारा त्यावेळी देण्यात आला होता. त्यानंतर एअरलाइनला जास्तीत जास्त 50 टक्के उड्डाणे ऑपरेट करण्याचे आदेश दिले होते.

First Published on: September 1, 2022 12:10 PM
Exit mobile version