इंजिनिअर आणि ॲग्रिकल्चर पदवीधर सेलची महिनाभरात होणार स्थापना; राष्ट्रवादीचा निर्णय

इंजिनिअर आणि ॲग्रिकल्चर पदवीधर सेलची महिनाभरात होणार स्थापना; राष्ट्रवादीचा निर्णय

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून इंजिनिअर आणि ॲग्रीकल्चर पदवीधर सेल या दोन सेलची स्थापना करण्यात येणार आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माहिती दिली. (Engineering and Agriculture Graduate Cell to be set up within a month NCP decision)

इंजिनिअर सेलच्या माध्यमातून राज्यातील इंजिनिअर तरुणांना संघटीत करण्याचे काम होणार आहे. तसेच, राज्यात लाखो ॲग्रीकल्चर पदवीधर असून त्यांना एकत्रित करून शेतीतील नवीन ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्याचा निर्णय झाला.

येत्या महिनाभरात या दोन्ही सेलची प्रत्येक तालुक्यात संघटना बांधणीचे काम राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरून करणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, शिवेसनेतील शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थकांच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. खरी शिवसेना कोणाची? हे ठरवण्याबाबतच्या सुनावणीस स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. न्यायालयाच्या याच निर्णयावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

“खरी शिवसेना कोणाची हे ठरवण्याची मागणी करणारा शिवसेनेचा अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे. हा निकाल प्रमुख आहे, असे मला वाटत नाही. मात्र निवडणूक आयोगासमोर सुरू असलेल्या सुनावणीला थांबवण्याचे सर्वोच्च न्यायालयाने अमान्य केले आहे. आता निवडणूक आयोग त्यावर कारवाई सुरू करेल. उद्धव ठाकरे निवडणूक आयोगातील सुनावणीमध्ये आपली बाजू मांडतील. त्यामुळे आयोगाच्या निकालापूर्वीच काही प्रतिक्रिया देणे अतिरंजित होईल”, असे जयंत पाटील यांनी म्हटले.


हेही वाचा – RBIचा मोठा निर्णय; ‘या’ करणार उपाययोजना

First Published on: September 27, 2022 7:57 PM
Exit mobile version