अभियंत्यांनी सातत्याने नाविन्याची कास धरावी : विजयकुमार गौतम

अभियंत्यांनी सातत्याने नाविन्याची कास धरावी : विजयकुमार गौतम

शासकीय सेवेत अभियंता म्हणून काम करत असताना विविध नाविन्यपूर्ण बाबींच्या कडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून रोज काहीतरी नवीन शिकण्याची उत्सुकता, जिज्ञासा आपल्या मनात ठेवावी असे प्रतिपादन जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विजय कुमार गौतम यांनी केले.

महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी( मेटा) नाशिक अंतर्गत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2018 मध्ये उत्तीर्ण झालेल्या जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभागातील प्रशिक्षणार्थी अभियंत्यांचे प्रशिक्षण वर्ग सुरू आहेत. सदर प्रशिक्षण वर्ग मध्ये जलसंपदा विभागातील28 नवनियुक्त सहाय्यक अभियंता श्रेणी-1 व सहाय्यक कार्यकारी अभियंता प्रशिक्षणासाठी उपस्थित असून एकूण 52 आठवड्याचे पायाभूत प्रशिक्षण दिनांक 1जानेवारीपासून प्रबोधनी मार्फत या विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शनासाठी जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विजय कुमार गौतम उपस्थित होते. यावेळी त्यांनी नवनियुक्त प्रशिक्षणार्थी अभियंत्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी ते म्हणाले, आपल्याला भविष्यात नेमून दिलेल्या कुठल्याही नियुक्तीच्या ठिकाणी उत्कृष्टपणे काम करून स्वतः चमकदार कामगिरी करण्याचा प्रयत्न करावा सिंचन प्रकल्पांना वेळेत गुणवत्तेने पूर्ण करण्याचे आवाहन तसेच पूर्ण झालेल्या प्रकल्पांमार्फत योग्य पद्धतीने सिंचनास ऊर्जितावस्था देण्याबाबतचे आवाहन पेलण्यासाठी नवीन अभियंत्यांनी उत्साहाने व आनंदाने काम करावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी जलसंपदा उत्तर महाराष्ट्र प्रदेश नाशिकचे मुख्य अभियंता संजय बेलसरे, मंत्रालयातील सहसचिव व मुख्य अभियंता कपोले, मेटाचे अधीक्षक अभियंता शिवप्रसाद बागडी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मेटाचे कार्यकारी अभियंता तथा प्रपाठक संदीप जाधव यांनी केले.

First Published on: February 6, 2021 7:05 PM
Exit mobile version