लग्नासाठी वधू वरांची थेट हेलिकॉप्टरमधून ‘एन्ट्री’

लग्नासाठी वधू वरांची थेट हेलिकॉप्टरमधून ‘एन्ट्री’

नाशिक : हौसेला मोल नाही असे म्हटलं जाते आणि याच वाक्याची प्रचिती देणारा सोहळा मालेगावमध्ये बघायला मिळाला. आयुष्यातील एक महत्वाचा क्षण म्हणजे लग्न.लग्नाचा हा सोहळा अविस्मरणीय व्हावा म्हणून प्रत्येकजण काहीतरी खास प्रयत्न करतो. असाच एक वेगळा प्रयत्न नाशिकच्या मालेगाव मधील बारा बलुतेदार मित्र मंडळाचे बंडूकाका बच्छाव यांनी घडवून आणला. लग्नसोहळयासाठी आदिवासी कुटुंबातील वधु वरांची हेलिकॉप्टरमधून झालेली ग्रॅन्ड एन्ट्री पंचक्रोशित चर्चेचा विषय ठरली.

लखमापूर येथील वर चि.लोकेश व चंदनपुरी येथील वधू पूर्वी या आदिवासी कुटुंबातील नवदाम्पत्याच्या लग्न सोहळ्यासाठी दोघा वधू वरांची लग्नस्थळाजवळ ‘एन्ट्री’ ही थेट हेलिकॉप्टर मधून करण्यात आली. मालेगाव येथील आदिवासी कुटुंबातील वर आणि वधू हेलिकॉप्टरने दाखल झाल्याची ही घटना पहिल्यांदाच घडत असल्याने वधू -वरांना पाहणार्‍यांची मोठी गर्दी केली होती. मालेगाव शहरातल्या मसगा महाविद्यालयाच्या मैदानावरुन सजवलेल्या रथात निघालेल्या या आगळ्या वेगळ्या वर-वधुंची मिरवणुक पाहण्यासाठी बघ्यांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

बारा बलुतेदार मित्र मंडळाचे बंडू काका बच्छाव व वधू पिता कैलास पवार या दोघांची ३० वर्षांपूर्वीची अपार अशी मैत्री असल्याने वधुपिता यांनी बंडूकाका बच्छाव यांचेकडे तुमच्या मुलीचा जसा शाही विवाह सोहळा झाला. सोहळ्याची संपूर्ण नाशिक जिल्हा व पंचक्रोशीत चर्चा झाली होती तसाच तसाच आगळा वेगळा विवाह सोहळा माझ्या मुलीचा देखील व्हावा अशी इच्छा प्रकट केली होती. त्यानुसार मित्र बंडू बच्छाव यांनी मित्राला दिलेला शब्द पूर्ण करत लाखो रुपयांचा खर्च करत विवाह सोहळा पार पाडत मित्राची इच्छा पूर्ण केली. थेट वधू पूर्वी व वर लोकेश यांना हेलिकॉप्टर द्वारे लग्न मंडपात आणले लग्नसोहळ्या प्रसंगी शेवटी वधूपित्याने भावनिक होत, मित्र असावा तर असा अशा शब्दात बंडू बच्छाव यांचे आभार मानले.

First Published on: April 24, 2023 7:54 PM
Exit mobile version