दरमहा २१ हजार रूपयांपर्यंत पगार आहे! मग तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची

दरमहा २१ हजार रूपयांपर्यंत पगार आहे! मग तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची

प्रातिनिधीक फोटो

ESIC आयुषमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत येणारी रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांद्वारे आरोग्य सेवा प्रदान करते. ESIC कर्मचारी विमा योजना ही सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कर्मचार्‍यांसाठी आरोग्य विमा योजना आहे. ज्या संस्थेत १० ते २० कर्मचारी किंवा अधिक कर्मचारी काम करतात, त्यांच्यासाठी ही योजना लागू आहे आणि ही योजना केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत चालविली जाते. दरम्यान, ESIC अर्थात राज्य विमा महामंडळाच्या विमाधारकांना १ एप्रिलपासून ७३५ जिल्ह्यांमध्ये ESI या योजने अंतर्गत आरोग्य सेवा उपलब्ध होणार असल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ESIC च्या आयपींसाठी (Insured Persons) मिळणार आहे. या योजने अंतर्गत येणाऱ्या दिव्यांगांसंदर्भात उत्पन्नाची मर्यादा २५ हजार रूपये ठेवण्यात आली आहे. ESIC नोंदणी करताना कर्मचाऱ्यास कुटुंबातील सदस्यांविषयी माहिती देणं आवश्यक असते. ESIC नोंदणी नियोक्ताद्वारे करण्यात येते. तसेच ESIC मध्ये दोन्ही कर्मचारी आणि नियोक्ते ESIC मध्ये योगदान देतात. यासह कर्मचारी पगाराच्या ०.७५ टक्के ESIC द्वारे नियोक्त्याने ३.२५ टक्के योगदान ESIC मध्ये देण्यात येते.

कर्मचाऱ्यांना ESI योजनेंतर्गत असे होतात फायदे

कर्मचाऱ्यांना या योजनेंतर्गत त्याला व त्याच्या कुटुंबास वैद्यकीय सुविधांचा लाभ घेता येतो. ESIC रूग्णालयातील कर्मचाऱ्यांवर निःशुल्क उपचार करण्यात येतात. कर्मचाऱ्याला गंभीर आजार झाल्यास खासगी रुग्णालयात संदर्भित केले जाते. खासगी रुग्णालयात दाखल झाल्यावर संपूर्ण खर्च ESIC उचलते. गंभीर आजाराने कर्मचाऱ्याने त्रस्त असेल आणि काम करण्यास असमर्थ असतील तर ESIC त्या कर्मचार्‍यास त्याच्या पगाराच्या ७० टक्के रक्कम देते. ESIC च्या योजनेंतर्गत गरोदर महिलांना त्यांच्या प्रसूतीची रजा देखील दिली जात असून त्यांना ६ महिन्यांचा पगारही दिला जातो. यासह कर्मचार्‍याच्या मृत्यूनंतरही ESIC सहाय्य करते. यावेळी कर्मचाऱ्याच्या अंत्यसंस्कारासाठी १५ हजार रुपये दिले जाता. तर या योजनेचा लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्याच्या मत्यूनंतर त्याच्यावर अवलंबून राहणाऱ्याला आयुष्यभर पेन्शन देखील दिले जाते.

First Published on: January 28, 2021 11:00 AM
Exit mobile version