लॉकडाऊन असलं तरी काळजी नको, या गोष्टी सुरुच राहणार

लॉकडाऊन असलं तरी काळजी नको, या गोष्टी सुरुच राहणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशाला संबोधत एक महत्त्वाची घोषणा केली. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मंगळवारी मध्यरात्रीपासून २१ दिवसांसाठी देश लॉकडाऊन करण्यात येणार आहे. मात्र, लॉकडाऊन वरुन नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण झाला आहे. २१ दिवस सर्वच बंद राहणार असल्याचे ऐकून नागरिकांनी किराणा सामानाचे दुकान, मेडिकल, पेट्रॉल पंप यांच्याबाहेर गर्दी करायला सुरुवात केली आहे. मात्र, लॉकडाऊनमध्ये आवश्यक सेवांवर परिणाम होणार नसल्याचे पंतप्रधानांनी सांगितले आहे.

या गोष्टी सुरु राहणार

किराणा सामानाचे दुकान
दुग्धशाळा
एटीएम
वैद्यकीय सेवा
मेडिकल
पेट्रॉल पंप

दरम्यान, २१ दिवस घर सोडू नका, असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे. पंतप्रधान आपल्या भाषणात म्हणाले की, देशभरात लॉकडाउन कर्फ्यूसारखेच होईल. “जर तुम्ही २१ दिवस या लॉकडाऊनचे अनुसरण केले नाही तर देश २१ वर्षे मागे जाईल,” असे पंतप्रधान म्हणाले.

 

First Published on: March 24, 2020 9:55 PM
Exit mobile version