मराठा-ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी एकाच मागासवर्गीय आयोगाची स्थापना करा – चंद्रकांत पाटील

मराठा-ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी एकाच मागासवर्गीय आयोगाची स्थापना करा – चंद्रकांत पाटील

मराठा समाजाला आरक्षण देणं आणि ओबीसी आरक्षण हे प्रश्न सोडवण्यासाठी एकाच मागासवर्गीय आयोगाची स्थापना करावी, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यात सध्या मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरुन वातावरण तापलं आहे. मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वात कोल्हापुरातून मूक मोर्चाला सुरुवात झाली. तर नाशिक येथे ओबीसी आरक्षणासाठी समता परिषदेने देखील रास्ता रोको आंदोलन केलं.

दरम्यान, मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन चंद्रकांत पाटील राज्य सरकारकडे मागणी केली आहे. मराठा समाजातील आरक्षण देण्यासाठी जे जे लढतायत मग ते उदयनराजे असतील, संभाजीराजे, नरेंद्र पाटील असतील सर्वांना आम्हाला पाठींबा. मराठा समाजातील एकवीसशे उमेदवारांच्या भरतीचा प्रश्न मार्गी लावावा. रिव्ह्यु पिटीशन लवकरात लवकर दाखल करावा. मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशासाठी लागणारी अतिरिक्त फी सरकारने भरावी. मराठा समाजाला आरक्षण देणे आणि ओबीसी आरक्षण हे प्रश्न सोडवण्यासाठी एकाच मागासवर्गीय आयोगाची स्थापना करावी. तसंच मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवावं, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली.

सामनामधे तुम्ही काहीही लिहता

काल बुधवारी भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. सामनामधे तुम्ही काहीही लिहता, त्याला काही आधार नसतो. भाजप कार्यकर्त्यांच्या हातात काही दगड गोटे नव्हते. लोकशाहीत निदर्शनेही करायची नाहीत का? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला.

 

First Published on: June 17, 2021 4:30 PM
Exit mobile version