आदिवासी विद्यार्थ्यांना आता IAS, IPS होण्याची संधी, दरवर्षी 100 विद्यार्थ्यांना मिळणार मोफत प्रवेश

आदिवासी विद्यार्थ्यांना आता IAS, IPS होण्याची संधी, दरवर्षी 100 विद्यार्थ्यांना मिळणार मोफत प्रवेश

chandrakant patil

मुंबई – आदिवासी कुटुंबातील विद्यार्थ्यांना आयएएस आणि आयपीएस होण्याची संधी मिळणार आहे. दरवर्षी शंभर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण मिळणार असून विद्यार्थ्यांना 12 हजार विद्या वितेन देखील मिळणार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे. राज्य सरकार आणि आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेने पुढाकार घेतला असून याबातचे ट्वीट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

ट्वीटमध्ये काय? –

ट्वीटमध्ये राज्यातील प्रत्येक तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्येक शैक्षणिक सुविधा पोहोचावी, यासाठी राज्य सरकार सदैव तत्पर आहे. राज्य शासनाच्या स्वतंत्र योजनेअंतर्गत आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांनाही आयएएस, आयपीएस होण्याची संधी मिळणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

राज्य शासन आणि आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेने यासाठी पुढाकार घेतला असून या योजनेसाठी चार कोटी रूपयांची स्वतंत्र योजना राबण्यात येणार आहे. यातून दरवर्षी शंभर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण मिळणार आहे. विद्यार्थ्यांना 12 हजार रूपये विद्या वेतन मिळणार आहे. याबरोबरच अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिल्लीमध्ये राहण्याची व्यवस्था देखील करण्यात येणार आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

First Published on: August 29, 2022 7:41 PM
Exit mobile version