कोणीही उपाशी झोपणार नाही – अरविंद केजरीवाल

कोणीही उपाशी झोपणार नाही – अरविंद केजरीवाल

दिल्ली सरकारने गरजूंना आणि गरीबांसाठी लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत आधार म्हणून दररोज अन्न पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील ३२५ शाळांमधून हे अन्न वितरण केले जाणार आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांचे अन्न खाण्याचे होत आल्याचे लक्षात आल्यानेच दिल्ली सरकारने ही तातडीची उपाययोजना म्हणून ही घोषणा केली आहे. कोणीही अन्नाशिवाय वंचित राहणार नाही म्हणूनची खबरदारी म्हणून दिल्ली सरकारचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हा निर्णय़ आज जाहीर केला.

आम्ही सध्या गरजूंसाठी केलेल्या व्यवस्थेनुसार दिल्लीतील ३२५ शाळांच्या माध्यमातून एकुण ५०० जणांना दररोज अन्न मिळेल अशी ही व्यवस्था करण्यात आली आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. आतापर्यंत आम्ही दररोज २० हजार लोकांना रोजचे अन्नाचे वाटप करत आहोत. हा आकडा आम्ही केलेल्या व्यवस्थेमुळे २ लाखांपर्यंत वाढला जाऊ शकतो असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

याआधीच दिल्ली सरकारने ७२ लाख नागरिकांना मोफत शिधा वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली सरकारच्या रेशन योजनेंतर्गत असलेल्या ७२ लाख नागरिकांना या मोफत शिधा उपभोग घेता येणार आहे. दिल्ली सरकारच्या या रेशन योजनेंतर्गत एकूण १८ लाख कुटुंबे येत असल्याचं समोर येत आहे.
केजरीवाल यांनी स्पष्ट केल्यानुसार प्रत्येक व्यक्तीला ७.५ किलो रेशन मिळेल. यापूर्वी ५ किलो रेशन दिले जात होते. मात्र आता परिस्थिती पाहून यामध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रत्येक व्यक्ती अडीच किलो जास्त रेशन मिळणार आहे.


हे ही वाचा – CoronaVirus: सांगलीत आढळले आणखी १२ करोना पॉझिटिव्ह; राज्यात एकूण १४७ रुग्ण

First Published on: March 27, 2020 5:06 PM
Exit mobile version