महाराष्ट्रात मार्चपर्यंत कोरोना आटोक्यात येईल – तज्ज्ञ

महाराष्ट्रात मार्चपर्यंत कोरोना आटोक्यात येईल – तज्ज्ञ

महाराष्ट्रात मार्चपर्यंत कोरोना आटोक्यात येईल, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. राज्यातील संक्रमणाचा दर कमी झाला आहे. अशीच परिस्थिती कायम राहिली तर महाराष्ट्रात मार्चपर्यंत कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळवता येईल. महाराष्ट्रात गुरुवारी ३,५०७ नवीन कोरोना रुग्ण सापडले असून ५८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या १९,३२,११२ आणि ४९,५२१ मृत्यूची नोंद झाली आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत मुंबईत सलग दुसर्‍या दिवशी ७१४ नवीन रुग्णांची नोंद झाली आणि नऊ मृत्यूची नोंद झाली. एकूण रुग्णांची संख्या आतापर्यंत वाढून २,९३,४३६ पोहोचली आहे तर मृत्यू आकडा ११,११६ वर पोहोचला आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, संक्रमणाचा दर कमी होत चालला आहे. “लोकांमध्ये अँटीबॉडी तयार होण्याच्या टक्क्यांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचं प्रमाण कमी झालं आहे. याबद्दल आम्हाला आनंद होत आहे. मात्र, प्रशासन सावधगिरी बाळगत आहे,” असं एका अधिकाऱ्यानं सांगितलं. राज्यातील संसर्गजन्य रोग प्रतिबंधक नियंत्रण आणि तांत्रिक समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंखे म्हणाले, महाराष्ट्रातील आताचं कोरोना संसर्गाचं प्रमाण असंच राहिलं तर मार्चमध्ये अधिक चांगली परिस्थिती निर्माण होईल. ते पुढे म्हणाले की, नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे.

“दिवाळीच्या वेळी सार्वजनिक ठिकाणी गर्दीमुळे कोरोनाचं संक्रमण वाढलं, परंतु उत्तर भारतात, विशेषत: दिल्लीत ज्या पद्धतीने रुग्ण आढळले त्या तुलनेत महाराष्ट्रात कमी आढळले. हे खूप सकारात्मक चिन्ह आहे आणि जर असंच चालू राहिलं, अँटिबॉडी वाढत गेल्या तर आणि जानेवारीपर्यंत प्रकरणे कमी होत गेली तर आपण चांगल्या स्थितीत पोहचू. मार्चपर्यंत आम्ही आणखी चांगल्या स्थितीत येऊ,” असं साळुंखे म्हणाले.


हेही वाचा – Corona Vaccine: WHO ची फायझर लसीच्या आपतकालीन वापराला मान्यता


 

First Published on: January 1, 2021 11:12 AM
Exit mobile version