लातूरमध्ये अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या

लातूरमध्ये अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या

लातूरमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या

राज्यामध्ये सध्या दुष्काळाचे सावट आहे. लातूरमध्ये दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे. लातूरमध्ये एका अल्पभुधारक शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नापिकीला कंटाळून शेतकऱ्याने विष प्राशन करुन आत्महत्या केली आहे. लातूर जिल्ह्यातील किनगावजवळील मोहगाव येथे ही घटना घडली आहे. नागनाथ शिरसाठ या ३५ वर्षाच्या शेतकऱ्याने दुष्काळ आणि नापिकीला आत्महत्या केली. विष प्राशन करुन नागनाथ यांनी जीवन संपवले. याप्रकरणी किनगाव पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नापिकीला कंटाळून आत्महत्या

नागनाथ शिरसाठ यांच्याकडे तीन एकर शेती होती. मात्र दुष्काळ आणि नापिकीमुळे गेल्या दोन वर्षात शेतीतून काहीच उत्पन्न निघत नव्हते. त्यामुळे संसाराचा गाडा चालवणे कठीण झाले होते. मेहनत करुन शेतात हरभरा लावून देखील उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे नापिकी आणि घरखर्चाला कंटाळून नागनाथ यांनी आत्महत्या केली आहे. आज सकाळी शेतातल्या हरभरा पिकाला पाणी देत असताना त्यांनी विष प्राशन केले.

आकस्मित मृत्यूची नोंद

नागनाथ शिरसाठ दोन वर्षापासून त्यांच्या वडिलांपासून वेगळे राहत होते. त्यांच्या पाश्चात आई-वडील,पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. त्याच्या आत्महत्येवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी किनगाव पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणाचा तपास किनगाव पोलिसांकडून सुरु आहे.

हेही वाचा- 

धक्कादायक: स्वतःची चिता रचून शेतकरी महिलेनी केली आत्महत्या

First Published on: December 3, 2018 4:12 PM
Exit mobile version